शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

गोरेगावातील शेतीचे नुकसान; पीक कुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:04 IST

महसूल, कृषी विभागाने पंचनामे करण्याची मागणी

- गिरीश गोरेगावकर माणगाव : मागील आठवडाभरात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोरेगाव शहर आणि परिसरातील शेतीला सलग आठ दिवस पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळे भातशेतीसह शेतकरी संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीवर पाणी तुंबलेले राहिल्याने भाताचे पीक कुजून तसेच करपून गेले आहे, त्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाने या भागाची तातडीने पाहणी करून ओला दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.दक्षिण रायगड या भागाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य जनता ही पावसाळ्यात शेतीवरती अवलंबून असते. मागील आठवड्यात गोरेगाव विभागात विक्रमी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर भात लागवडीची शेती सलग आठ दिवस पुराच्या पाण्याखाली होती. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणी वेळेवरती आटोपली होती तर भातपिकांची रोपेही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला होता. गोरेगावातील संत रोहिदास नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, हौदाची आळी, टेकडीची आळी, गवळआळी, गोरोबानगर येथील नागरिक आजही शेतीवरतीच आपली उपजीविका करत आहेत. काळनदीला पूर आल्याने आठवडाभर पुराचे पाणी शेतामध्येच राहिले होते. महापुराचा तडाखा बसल्यानंतरही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतीच्या रूपाने मोठी वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गोरेगावचे सरपंच जुबेरअब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलेकर, विनोद बागडे, सचिन बागडे, सुरज पवार या ग्रामपंचायत सदस्यांसह विजयराज खुळे, मुख्तार वेळासकर, विकास गायकवाड यांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीची पाहणी केली असता शेतकऱ्यांनीआपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यानंतर महसूल तसेच कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.सध्या पूरपरिस्थितीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावर चिखल आणि माती आल्याने अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून लेप्टो स्पायरोसिससारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर व्हायरल फिवर, मलेरिया, डेंग्यू हे आजारही उद्भवू शकतात. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी घर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळभाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे.- डॉ. दिगंबर गीतेरसायनमिश्रीत पाणी शेतातमहाड भागातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या पुरामुळे रासायनिक पाण्याचा मोठा फटका शेतीला बसला. शेतामध्ये रसायनमिश्रित पाणी शेतात थांबून राहिल्याने रोपे मोठ्या प्रमाणात करपलेली पाहायला मिळत आहेत. पावसाने यंदाचे पीक घालविल्यामुळे वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.