शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: पनवेलमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन; महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:26 IST

औद्योगिक वसाहतीतील ज्या उद्योगांना उद्योग सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अथवा राज्य सरकारच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे, असे उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत.

पनवेल : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नवी मुंबईसह पनवेल महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पनवेलमध्ये आज रात्री ९ वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १४ जुलैपर्यंत सकाळी ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ २ किमीपर्यंत जाण्याची मुभा असणार आहे. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

पनवेल महानगरपालिका आणि ग्रामीण भागात हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस पुरेल इतक्या अत्यावश्यक सामानाचा साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. या लॉकडाऊनदरम्यान रुग्णालये तसेच औषधांची दुकाने, रुग्णवाहिका सुरू राहणार आहेत. याव्यतिरिक्त खाजगी प्रवासी वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आॅनलाइन पद्धतीने मद्यविक्री सुरू राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने, कार्यक्रम, कार्यशाळा, गोदामे आदींसह सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पीठ, डाळ, तांदूळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, चारा इत्यादींसह अत्यावश्यक यंत्रणेत गुंतलेले उत्पादन युनिट्स सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे.

औद्योगिक वसाहतीतील ज्या उद्योगांना उद्योग सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अथवा राज्य सरकारच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे, असे उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस