शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: पनवेलहून ओडिशाला जाणारी रेल्वे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:59 IST

रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती

अलिबाग : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याबाबत अडचणी वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेलहून एक हजार २०० मजुरांना ओडिशा राज्यात घेऊन जाणारी विशेष रेल्वे गुरुवारी राज्य सरकारला रद्द करावी लागलीे. ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाऱ्यांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशा सरकारकडून परवानगी न मिळाल्याने आपापल्या गावी निघालेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल ६० हजाराहून अधिक नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करुन आपापल्या राज्यात जाण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशसाठी दोन रेल्वे आणि बिहारसाठी एक रेल्वे सोडण्यात आली आहे. त्यामध्ये अनुक्रमे दोन हजार ४०० आणि एक हजार २०० अशा एकूण तीन हजार ६०० नागरिकांचा समावेश आहे.

गुरुवारी रात्री आठ वाजता पनवेल रेल्वे स्टेशनहून ओडिशात रेल्वे सोडण्यात येणार होती. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ६३०, पेण तालुक्यातील ४१६ आणि अलिबागमधील १५६ नागरिकांना घेऊन रेल्वे पनवेलहून रवाना होणार होती.त्यासाठी अलिबागमधील १५६ नागरिकांना दुपारीच एसटीने पनवेलला नेण्यात आले होते. त्यांना आता परत आणावे लागत असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी सांगितले. पेण, पनवेल येथील नागरिक रेल्वे स्थानकात पोचले नसल्याने प्रशासनाचा त्रास वाचला आहे. हा निर्णय दुपारी दोन वाजता कळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात जाणाºया नागरिकांची सर्व तयारी पूर्ण केली आहे. परंतु बिहार राज्यानेही ११ मे पर्यंत अन्य राज्यातून येणाऱ्यांना मनाई केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारची अशीच भूमिका असल्याने अडचण वाढली आहे. गुरु वारी तीन रेल्वे पाठवण्याचे नियोजन होते असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती. मात्र ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाºयांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशाकडे जाणारी रेल्वे सरकारला रद्द करावी लागली आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यासाठी हा निर्णय नाही, तर सर्व राज्यांसाठी हा नियम लागू होतो. तसेच उत्तर प्रदेश सरकारने तर तपासणी करूनच पाठविण्याबाबत सांगितले आहे. - आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस