शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जेएसडब्ल्यू कंपनीकडून जीवितास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:38 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांची पोलीस संरक्षणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवनाची केलेली कत्तल आणि खाडीमध्ये अवैध भरावाबाबतची तक्रार भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांनी केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी वन प्रशासनाने स्थळपाहणी अहवालाची प्रक्रिया राबवली होती, परंतु स्थानिकांनी ती कंपनीच्या इशाऱ्यावर उधळून लावली होती. या प्रकरणात कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासाकडून जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.संरक्षित असणाºया कांदळवनांची कत्तल करुन तसेच खाडीमध्ये बेकायदा भराव करुन जेएसडब्ल्यू कंपनी कायदा धाब्यावर बसवत आहे. याबाबत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अ‍ॅड.मोहिते यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वनसंरक्षक यांच्याकडे केली होती. त्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी वनविभागाने स्थळपाहणी करण्याचे ठरवले होते. पंचनाम्यासाठी संबंधिताना नोटीस देण्यात आली होती. जागेवर पोहोचल्यानंतर सुमारे ८० नागरिक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कंपनीच्या सांगण्यावरूनच त्यांनी स्थळपाहणी करण्याचे रोखले. माझे सहकारी परशुराम म्हात्रे, अनंता पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील यांना धमकवण्यास सुरुवात केल्याचे अ‍ॅड.मोहिते यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.जमाव मोठा असल्याने वडखळ पोलीस ठाण्यातील एक पोलीस वन विभागाचे अधिकारी, खारभूमी विभागाचे अधिकारी हतबल झाले होते.संबंधित कंपनीने षडयंत्र रचून स्थळपाहणीच्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. कंपनीने केलेली कृत्य बाहेर काढत असल्याने, माझ्या जीवितास सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासनाकडून धोका निर्माण झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष असल्याने रात्री-अपरात्री बाहेर जावे लागते. संबंधितांकडून माझ्याबाबत घातपात होण्याची शक्यता असल्याने, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे, तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

खारबंदिस्थीच्या सुरू असणाºया कामाबाबत कंपनीचा कसलाही संबंध नाही. स्थळपाहणी उधळून लावणारे हे स्थानिक होते. या प्रकरणात कंपनीला गोवण्यात येत आहे. आमच्या कंपनीचे मालक आणि कंपनी प्रशासन यांचे नाव उगाचच बदनाम करण्यात येत असल्याने सदरचे आरोप धादांत खोटे आहेत. -नारायण बोलबुंडा (जनसंपर्क प्रमुख, जेएसडब्ल्यू)