शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:21 IST

वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अतिवृष्टीने श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

श्रीवर्धन : वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अतिवृष्टीने श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळात अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. सतत पडणाºया पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत.श्रीवर्धन तालुक्याच्या तिन्ही बाजूने समुद्र असून पावसाबरोबरच उधाणाच्या भरतीचाही किनारी गावांना धोका आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचते. नगरपालिका ते तहसील कार्यालयादरम्यानचा रस्ता चिखलमय झाला आहे. एसटी स्टँडच्या समोरील बाजूस पाणी साचते. अवघ्या काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनच्या जीवना बंदराजवळ झालेल्या वादळाने अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात आले आहेत.श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावर कोंडविल, तर समुद्र किनाºयाच्या आदगाव, सर्वा, नानवेली व दिघी या गावातील हद्दीत दरडण्याची शक्यता आहे. आदगाव, सर्वा व नानवेली या तिन्ही गावांच्या वाहतुकीचे रस्त्याच्या दुतर्फा डोंगर व दाट वनराई आहे. आदगाव सर्वा रस्त्याच्या कामासाठी उजव्या बाजूला असलेला डोंगरात खोदकाम सुरू असल्याने आदगाव सर्वा रस्ता दरडप्रवण क्षेत्र बनू शकतो.शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आदगाव कुणबी वाडीचा जोड रस्ता अक्षरश: वाहून गेला आहे. कुणबी वाडीची लोकसंख्या १५० च्या आसपास आहे. जोड रस्त्याच्या शेजारील शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. जोड रस्ताच वाहून गेल्यामुळे दळणवळणास अडचणी येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील वावे, नागलोली, धनगरमलई, आडी, कोलमांडला, जावेळे, गडबवाडी भागात दाट जंगल आहे. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडे कोसळली आहेत.