शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंग सुर्वे खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळेला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 17:18 IST

तळा तालुक्यातील राहाटाड गावातील पांडुरंग सुर्वे यांच्या खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळे यांस दोषी ठरवून, त्यास भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास आणि भादंवि कलम 452 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांनी मंगळवारी सुनावली आहे.

- जयंत धुळपरायगड- तळा तालुक्यातील राहाटाड गावातील पांडुरंग सुर्वे यांच्या खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळे यांस दोषी ठरवून, त्यास भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास आणि भादंवि कलम 452 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांनी मंगळवारी सुनावली आहे.तळा पोलीस ठाणे हद्दीतील भागाड येथे आरोपी सहदेव नारायण खंडागळे आणि मृत पांडुरंग सुर्वे याच्यात पंखा दुरुस्तीच्या कारणावरून आधी भांडण झाले होते. त्यानंतर 11 जुलै 2015 रोजी आरोपी सहदेव नारायण खंडागळे व त्याचा अज्ञान मुलगा यांनी पांडुरंग सुर्वे यांच्या घरी जाऊन सुर्वे यांना त्यांच्या घरातून अंगणात खेचून आणून त्यांना कोयत्याने व काठीने डोक्यावर मोठ्या व गंभीर दुखापत केली. त्यामध्ये पांडुरंग सुर्वे यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडविण्यासाठी मृत सुर्वे यांच्या पत्नी गेल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली.या खूनप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर.बी. चौधरी यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांच्या समोर झाली. या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. जितेंद्र द. म्हात्रे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. खटल्याच्या सुनावणीत समोर आलेल्या साक्षी व पुराव्यांना ग्राह्य धरून न्यायालयाने सहदेव नारायण खंडागळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.दरम्यान या खुनाच्या गुन्ह्यात सहदेव नारायण खंडागळे यांच्या अल्पवयीन मुलाचाही सहभाग होता. त्याच्यावरील खटला कर्जत येथील बाल गुन्हे न्यायालयात दाखल आहे. त्याचा निकाल अद्याप झालेला नसल्याची माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.जितेंद्र द. म्हात्रे यांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड