शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

"दिवंगत प्रशांत पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:04 IST

शोकसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांची श्रद्धांजली.

मधुकर ठाकूर, उरण : दिवंगत प्रशांत पाटील आपल्यातुन निघून गेलेले नाहीत तर ते सर्वांच्याच हृदयात आहेत. त्यांचे विचार व कार्य असेच पुढे नेऊ या . त्यांचे स्वप्न पूर्ण करू अशा भावना महाविकास आघाडीच्या नेते, पुढारी,कार्यकर्त्यांनी उरण येथील आयोजित शोकसभेतुन व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू  सहकारी प्रशांत पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने अकस्मीत निधन झाले.त्याच्या अकस्मीत मृत्यूनंतर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख व जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी  गुरुवारी (२७) संध्याकाळी शोकसभेचे आयोजन केले होते. जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उरणचे सुपुत्र, तरुण तडफदार आक्रमक नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या प्रशांत पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.या शोकसभेत व्यासपीठावर प्रशांत पाटील यांच्या मातोश्री हिरावती पाटील, पत्नी प्रज्ञा पाटील, मुले आदित्य व अद्वैत पाटील, भाऊ प्रवीण पाटील, राजस पाटील, कपिला पाटील, नूतन भट्टाचार्य आदी उपस्थित होते.

 तर या प्रसंगी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कामगार नेते ॲड.  सुरेश ठाकूर, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष मदन गोवारी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,माजी नगरसेवक झैद मुल्ला, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, काँग्रेस नेते आर. सी. घरत, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहून प्रशांत पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

याप्रसंगी जगजीवन भोईर, काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष रेखा घरत, कामगार नेते संतोष घरत, सूरदास गोवारी, ॲड. भार्गव पाटील,उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शेकाप महिला तालुकाध्यक्षा सीमा घरत, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, शिक्षक नेते नरसु पाटील, जेएनपीटी विश्वस्त रविंद्र पाटील, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार, भूषण पाटील, दत्ता मसुरकर, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हाध्यक्ष सदानंद येलवे, उलवे शहर अध्यक्ष संतोष काठे, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभापती काशिनाथ पाटील, विविध राजकीय पक्ष , सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक, मित्र परिवार आदी शोकसभेला मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Raigadरायगड