मुरूड : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. दुर्घटना घडणार नाहीत यासाठी एसटीचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तसेच तंत्रविभागाने वाहनांच्या तांत्रिक अडचणी गांभीर्याने सोडवल्या पाहिजेत, याशिवाय प्रशासनाने कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली राहील, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन रेवदंडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी केले.मुरूड आगारातर्फे आयोजित सुरक्षितता मोहिमेंतर्गत जनजागृती करण्यात आली. प्रवासी बसमध्ये त्या मार्गावरील असणारे पोलीस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिल्यास अपघात घडल्यास तातडीने मदत मिळणे शक्य होईल, याकडे लक्ष वेधले. महामंडळाने कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर आगार व्यवस्थापक तेजस गायकवाड, तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, लेखापाल प्रकाश भादरिंगे, कैलास भगत आदी उपस्थित होते.माणगावात पोलीस पाटील कार्यशाळा- माणगाव येथील तहसील कार्यालयात बुधवारी माणगाव, तळा तालुक्यातील डीवायएसपी दत्ता नलावडे यांच्या उपस्थितीत पोलीस पाटलांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेत दोन्ही तालुक्यांतील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माणगावचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे, गोरेगावचे पो. निरीक्षक विक्र म जगताप, तळा. पो. ठाण्याचे पो. नि. साबळे आदींनी मार्गदर्शन केले. - डीवायएसपी नलावडे यांनी, सर्व कायदे, कामाची सुसूत्रता, त्याबाबत येणाऱ्या अडचणी, गावात सुरू असलेले अवैध गावठी दारूचे धंदे यावर सक्त कारवाई करण्याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी दिली. पो. नि. लेंगरे यांनीही मार्गदर्शन केले. तर गोरेगावचे पो. नि. जगताप यांनी पोलीस पाटील अधिनियम १९६७बाबत पोलीस पाटील यांची कर्तव्य, नेमणुका यासंदर्भात माहिती दिली.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे
By admin | Updated: January 15, 2017 05:34 IST