शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गळके छप्पर, दारूच्या बाटल्या, साचलेला कचरा अन् दुर्गंधी, आरोग्यवर्धिनीची दुरवस्था

By वैभव गायकर | Updated: June 14, 2023 10:45 IST

१६ गावांतील आदिवासींची गैरसोय

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रूपांतरित झाल्या आहेत. या केंद्रात उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहेत. परंतु, गळके छप्पर, अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच आणि साचलेला कचरा तसेच दुर्गंधी अशी दुरवस्था पनवेलच्या कल्हे आरोग्यवर्धिनी केंद्राची झालेली आहे. या केंद्राला टाळे लागले असून, त्यावर अवलंबून असलेल्या १६ गावांतील आदिवासींची आरोग्य सुविधांअभावी परवड होत आहे. त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.

कल्हे आरोग्यवर्धिनी  केंद्रावर डोलघर, तारा, बांधणवाडी, बारापाडा या गावांसह रानसईमधील पाच ते सहा आदिवासी वाड्या, कल्हे गावासह आखाडवाडी, बामनडोंगरी, लहूंची वाडी, विठ्ठलवाडी आदी जवळपास १० ते १६ गावे व आदिवासी वाड्या अवलंबून आहेत.

१३ आरोग्य सुविधा

या केंद्रांतर्गत १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. त्यात प्रामुख्याने प्रसूतिपूर्व व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात शिशूंना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्यसेवा तसेच लसीकरणासह विविध सुविधांचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कल्हे आरोग्यवर्धिनी केंद्रात एएमएम नर्स पद  रिक्त आहे. या पदावरील एएनएम निवृत्त झाल्याने केंद्रात सध्या कोणीच नाही. त्या ठिकाणच्या आरोग्यसेवक पुरुषांना तत्काळ याबाबत सूचना देण्यात येतील. दुरवस्था दूर करण्यात येईल.- डॉ. सुनील नखाते, आरोग्य अधिकारी, पनवेल

टॅग्स :Healthआरोग्यpanvelपनवेल