शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:13 IST

कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आकुर्ले येथील टाकीला गळती लागली आहे.

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आकुर्ले येथील टाकीला गळती लागली आहे. या टाकीची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पाहणी केली आहे, या वेळी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.शासनाच्या १०० टक्के अनुदानातून कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर केले होते. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण केले. त्यानंतर ही पाणी योजना प्राधिकरणाने नगरपरिषदेच्या ताब्यात दिली. मात्र, योजनेच्या कामात अनेक त्रुटी असताना उद्घाटनाच्या हट्टापायी त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी ही योजना ताब्यात घेतली, त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाला आज पाणीपुरवठा योजनेबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.नगरपरिषद क्षेत्रातील आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी एक लाख ८० हजार लीटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला काही वर्षांनंतर गळती लागली होती, नगपरिषद प्रशासनाने या टाकीची गळती काढण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले होते. मात्र, आता या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने या परिसरातील नागरिकांची नेहमीच तक्रार असे आणि गळतीमुळे पाणी वाया जात असे. या गळक्या टाकीची पाहणी शुक्रवारी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केली. या वेळी त्यांच्या समवेत स्थानिक नगरसेविका प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, जल अभियंता अशोक भालेराव, नीलेश चौडीए, सुदाम म्हसे, पाणी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.या टाकीची गळती काढण्याचे काम सुरू केल्यावर या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल किंवा या परिसरात नवीन टाकी बांधावी लागल्यास त्यासाठी नवीन जागा शोधावी लागेल, या वेळी याच परिसरात दोन जागेची पाहणीसुद्धा करण्यात आली. याबाबत सभेमध्ये लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्षा जोशी यांनी सांगितले.