शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या काहिलीने पक्ष्यांची दाणा-पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:30 IST

तापमानाचा पारा वाढल्याने सारेच त्रस्त

विनोद भोईरलोकमत न्यूज नेटवर्कपाली : जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका पक्ष्यांना जास्त बसत आहे. त्यांची दाणा-पाण्यासाठी दाही दिशा वणवण होत आहे. यासाठी पक्षी मानवी वस्तीतदेखील येत आहेत. भूक-आणि पाण्यावाचून तसेच यातून येणाऱ्या तणावातून पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विळे पाटणूस भागात नुकत्याच अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. पाण्यासाठी वणवण फिरत असताना पिवळ्या डोळ्याचा सातभाई नावाचा पक्षी भरदुपारी वाहनांच्या धडकेने जखमी झालेला अभ्यासक राम मुंढे यांना आढळला. त्यानंतर हा पक्षी दगावला. त्याचदिवशी भीरा येथील संकेत देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात घारीचे एक मोठे पिलू निपचित बसले होते. त्यांनी मुंढे यांना याबाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे या पिलाच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि त्या पिलाला त्रास होऊ लागल्यामुळे ते अंगणात येऊन बसले होते, असे मुंढे यांनी सांगितले. त्यानंतर देवरुखकर यांनी त्या पिलाच्या अंगावर पाणी टाकले, तसे ते थोडे सावध झाले आणि उठून समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसले आणि आपल्या पंखांना पसरवून ते हालचाल करू लागले. 

पाणी पिऊन तासाभराने तेथून निघून गेले. यासंदर्भात राम मुंढे यांनी माणगाव वनविभागाशीदेखील संपर्क केला. आपल्या भागात अशा घटना घडत असतील, तर माणगाव वनविभाग यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन वनरक्षक अमोल निकम यांनी दिले.

ऊन वाढू लागल्याने पशु-पक्ष्यांची पाणी आणि अन्नासाठी भटकंती वाढते. तसेच सावलीचीदेखील आवश्यकता लागते. हे मिळविण्याच्या खटाटोपात पक्षी तणावात (स्ट्रेस) जातात आणि त्यांचा मृत्यू होेतो. लोकांनी आपल्या घराच्या छपरावर, अंगणात किंवा झाडावर थोड्या पाण्याची व दाण्याची थोडी व्यवस्था केली, तरी या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. तसेच जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाण्याचे स्रोत व पाणवठयामध्ये पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.    - डॉ. प्रशांत कोकरे,    पशुधन विकास अधिकारी, सुधागड

सध्या घारीची पिलं घरट्यातून बाहेर पडतात. आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात त्यांचे घरट्याच्या बाहेर पडणे त्यामुळे ते विचलित होतात आणि अशातच या पिलाला उन्हाचा त्रास व पाणी न मिळाल्याने ते जास्त बिथरले होते. असेच इतरही पक्ष्यांच्या बाबतीत घडते.- राम मुंढे

पाटणूस येथे देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात अन्न-पाण्याच्या शोधात आलेली घार. (छाया : विनोद भोईर)

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड