शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:46 IST

सहा लेनचे दोन बोगदे; २०२०पर्यंत काम पूर्ण होणार

जयंत धुळप ।अलिबाग : रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अपघातविरहित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाºया कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मे महिन्यात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निविदेच्या माध्यमातून या कामासाठी ५०२.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सन २०२०पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली आहे. त्यामुळे हा घाट पार करण्यासाठी लागणाºया ४० मिनिटांचा कालावधी अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे.रायगड, रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा दुवा असणाºया कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला रत्नागिरीची जिल्हाधिकारी प्रदीप पी., राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड, प्रांताधिकारी अमित शेडगे, खेडचे प्रांताधिकारी सोनावणे आणि कशेडी घाटाचे काम करणारे कंत्राटदारही उपस्थित होते.कशेडी घाटातील अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच कशेडी घाटाचे ३४ कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी तसेच गोवा महामार्गाने कोकणात जाणाºया प्रवाशांचा प्रवास अपघातविरहित करण्यासाठी कशेडी घाटातील बोगदा महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधित अधिकाºयांसोबत अनेक बैठका घेतल्या. केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहारही केला. त्यानुसार केंद्राच्या रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने निविदेच्या माध्यमातून या कामासाठी ५०२.२५ कोटी मंजूर केले आहेत.मे महिन्यापासून या बोगद्याचे पाथमुख उघडण्याचे काम सुरू होईल. भोगांवपासून या कामास सुरुवात करण्यात येईल. कशेडी येथे पावणे दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार असून, जाण्यासाठी व येण्यासाठी प्रत्येकी तीन लेन ठेवण्यात येणार आहे. तसेच बोगद्यामध्ये लाइटची तसेच व्हेंटिलेशन व्यवस्था, बोगद्यात गाडीत बिघाड झाल्यास गाडी बाजूला उभी करण्यासाठी विशेष व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच साईन बोर्डही लावण्यात येणार आहेत. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावरही त्या रस्त्याच्या देखभालीचे काम चार वर्षे कंत्राटदारालाच करावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र