शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

उन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:52 IST

सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे.

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहीर) पूर्णपणे मोडली आहे. त्यामुळे धरणातील बहुतांश पाण्याचा अपव्यय होत असून, धरण रिते झाले आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील दुरुस्तीची कामे संबंधितांनी करावी, अशी मागणी होत आहे.लघू पाटबंधारे विभागामार्फत १९७२ मध्ये उन्हेरे धरणाचे बांधकाम झाले. धरणाचे सिंचन क्षेत्र १४२ हेक्टर आहे. मात्र, ज्या उद्देशाने या धरणाची निर्मिती झाली त्या सिंचनासाठी पाण्याचा वापर होत नाही. मागील अडीच वर्षांपूर्वी जॅकवेल मोडकळीस आली होती. त्यामुळे धरणातून पाणी वाया जात होते. त्या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी करुन लवकरच विहीर व गेटची दुरु स्ती करणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा (पाटबंधारे) विभाग कोलाड यांनी सांगितले होते. मात्र, आजतागायत यासंदर्भात कोणतीच उपाययोजना झाली नाही. सध्या ही जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.>बेकायदा रेती उत्खननावर कारवाईहे धरण कोरडे होत असल्यामुळे येथे रेतीमाफिया सक्रिय झाले होते. मात्र, उन्हेरे धरण क्षेत्रातील बेकायदा रेती उत्खननावर मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. सहा ब्रास रेती जप्त केली असून धरण क्षेत्रात जाणारा रस्ता वाहनांकरिता पूर्णपणे बंद केला आहे, त्यामुळे येथील रेती उत्खनन आता बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त के ले. मात्र, इतरही अडचणी लक्षात घेऊन येथे योग्य त्या दुरुस्ती कराव्यात, अशी मागणी करीत आहे.तर येत्या काही दिवसांत येथे रेती उत्खननाबाबतची अधिक कारवाई देखील नियोजित असल्याचे तहसीलदार दिलीप रैनावार यांनी सांगितले.>हे केल्यास होईल फायदाधरणाची व कालव्याची दुरु स्ती केल्यास सभोवतालचा परिसर सिंचनाखाली येऊ शकतो. आजूबाजूच्या परिसरातील शेतीला, नद्यांना व विहिरींना मुबलक पाणी मिळेल. गाळ काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होईल.>धरण क्षेत्रातील समस्याधरणाची जॅकवेल पूर्णपणे तुटली आहे.धरणातील पाणीगळती लागून बाहेर वाया जात आहे.धरणाच्या बांधांवर झाडी वाढली आहे.धरण मद्यपींचा अड्डा बनले आहे.धरण गाळाने भरले आहे.>डिझाईन डिव्हिजनकडून डिझाईन मिळाले नव्हते त्यामुळे धरणाचे काम करता येत नव्हते. आता ते डिझाईन मिळाले आहे. त्यामुळे निविदा मागविण्यासाठीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. धरणाच्या दुरु स्ती कामाची निविदा मागविली जाणार आहे. त्यानंतर धरणाच्या दुरु स्तीचे काम पूर्ण केले जाईल.- आर. के. सुपे, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग कोलाड.अधिकाधिक लोकांनी सिंचनासाठी पाणी वापरणे गरजेचे आहे. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे धरणाची वेळीच दुरु स्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा आमच्या पंचक्र ोशीला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.- शिवमूर्ती पवार,पोलीस पाटील, उन्हेरे