शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

तलाठ्यांच्या हाती लॅपटॉप

By admin | Updated: December 30, 2016 04:02 IST

ग्रामीण भागातील महसूल प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान व्हावा यासाठी जिल्ह्यातील ३७५ तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे

- आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण भागातील महसूल प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान व्हावा यासाठी जिल्ह्यातील ३७५ तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून दोन कोटी ४६ लाख रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लॅपटॉपमुळे तलाठ्यांच्या डोक्यावरील कामाचा भार हलका होऊन संबंधितांना तातडीने सातबारा उतारा, फेरफार नोंदीची प्रत जागच्या जागी प्राप्त होणार आहे.ई-गर्व्हनर्सच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार गतिमान आणि कमीत कमी कागदाचा वापर करण्यावर भर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी त्यांनी आॅनलाइन सातबारा, फेरफार उतारा देण्याची योजना सुरू केली होती. दोन ग्रामपंचायतीसाठी एक तलाठी अशी जिल्ह्यात अवस्था असल्याने तलाठ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता. शिवाय सर्व्हर सातत्याने डाऊन होत असल्याने तासन्तास कामाचा खोळंबा होत होता. त्यामुळे संबंधितांच्या रोषाला तलाठ्यांना सामोर जावे लागायचे. तलाठ्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबत आवाज उठविला होता. तसेच संपाचे हत्यार उपसून आंदोलनही छेडले होते. सरकारला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ आॅक्टोबर २०१६ रोजी तलाठ्यांना लॅपटॉप देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्याच्या संबंधित पालकमंत्र्यांनी याची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार त्यात्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून लॅपटॉप आणि प्रिंटर खरेदीसाठी निधी द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांना ३ नोव्हेंबरच्या पत्रान्वये दिले होते. या योजनेमुळे सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तलाठी एखाद्याला रस्त्यातही प्रिंट देऊ शकणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान होण्यास मदत मिळणार असल्याने त्याचे स्वागत होत आहे.जिल्ह्यामध्ये ३१५ तलाठी रायगड जिल्ह्यामध्ये ३१५ तलाठी आणि ६० मंडळ अधिकारी अशी एकूण ३७५ संख्या आहे. एका लॅपटॉप आणि प्रिंटरसाठी सुमारे ६२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार दोन कोटी ५४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. परंतु जिल्हा नियोजन समितीकडे दोन कोटी ४६ लाख रुपयांचा निधी शिल्लक असल्याने तेवढीच रक्कम देण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लॅपटॉपसाठी स्वतंत्र इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी डोंगलचा वापर करावा लागणार आहे. ते खरेदी करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासन निधी देऊ शकते. आॅनलाइन सातबारासाठी काही शुल्क आकारले जाणार असल्याने त्या खर्चातून इंटरनेटचे बिल अदा करता येऊ शकते, असे जाधव यांनी सुचविले.