शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांचा हैदोस

By admin | Updated: June 14, 2016 01:27 IST

कर्जत, नेरळ व परिसरातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, भरावासाठी डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडले जात आहेत.

- कांता हाबळे, नेरळ

कर्जत, नेरळ व परिसरातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, भरावासाठी डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडले जात आहेत. परंतु डोंगर फोडून माती काढणाऱ्यांवर करवाई होताना दिसत नाही. नियम धाब्यावर बसवून माती उत्खनन होत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.कर्जत तालुक्यासह नेरळ परिसरात जमीन सपाट करण्याचीही कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे जमिनीमध्ये जेसीबी फिरवत असताना त्याची रीतसर परवानगी रॉयल्टी भरून घ्यावी लागते. मात्र अशी परवानगी फार कमी प्रमाणात घेऊन कामे सुरू आहेत. महसूल खात्याचा महसूल बुडत असताना मात्र तलाठी व त्यांचे अधिकारी म्हणून काम करणारे महसूल मंडळ अधिकारी यांची भूमिका माती उत्खनन प्रकारात संशय निर्माण करणारी असल्याचे बोलले जात आहे. अशी कामे सुरू असताना कर्जत तालुक्यात महसूल खात्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांना अशी मोहीम राबविण्याचे अधिकार नाहीत का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र महसूल खात्याकडून बेकायदा माती व रेती उत्खननावर करवाई केली जात आहे. मात्र कर्जत तालुक्यात असे होताना दिसत नाही, रेती जमीन सपाटीसाठी माती रॉयल्टीतून महसूल जरी मिळत असला तरी त्यातून होणारी निसर्ग आणि पर्यावरणाची हानी कितीतरी धोक्याची व तोट्याची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नियमांची पायमल्ली; डोंगर उद्ध्वस्तनियमाप्रमाणे तहसीलदारास १०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी असते. त्यानंतर अधिक ५०० ब्रास गौण खनिज उत्खननासाठी परवानगी प्रांत कार्यालयातून काढली जाते. यापेक्षा अधिक २०० ते १००० पर्यंतच्या ब्रासच्या गौण खनिज उत्खननासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला परवानगी देण्याचा अधिकार असतो. त्यापेक्षा अधिक उत्खननासाठी जिल्हाधिकारी व मंत्रालयातून परवानगी काढली जाते. परंतु कर्जत तालुक्यात विकासकांकडून लहान - मोठे डोंगर उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियमानुसार उत्खनन होते का, यावर महसूल खात्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.नेरळमधील काही ठिकाणी सुरु असलेल्या माती उत्खननाची रॉयल्टी भरलेली आहे. ज्या ठिकाणची रॉयल्टी भरलेली नाही अशा त्याठिकाणी तलाठी, मंडळअधिकारी यांना पाठवून चौकशी करून त्यांच्यावर करवाई करण्यात येईल.- रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, कर्जत नेरळ परिसरात ज्या ज्या ठिकाणी माती उत्खनन सुरू आहे, अशा ठिकाणची पाहणी करून ज्यांनी रॉयल्टी भरली नसेल अशा माती उत्खनन करणाऱ्यांवर करवाई करण्यात येईल.- एच. एम. सरगर, मंडळ अधिकारी, नेरळदहीवली - देवपाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू आहे. त्याची कोणतीही रॉयल्टी भरलेली नाही. या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे कोणतेही वाहन आढळून आले नाही. या संदर्भात तहसील कार्यालयात कळविले आहे.- जयश्री मोरे, तलाठी, दहीवली