शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहण : शेतकºयांना रिलायन्सकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 07:00 IST

रिलायन्स प्रशासनाकडून कर्जत तालुक्यातील कोदिवले-बिरदोले येथील शेतकºयांना नोटीस पाठवून धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत त्या शेतकºयांसोबत मोबदला तसेच भविष्यातील धोका याविषयी कोणतीही माहिती न देता थेट दलालांना शेतकºयांच्या घरी पाठवून पंचनामे करून घेण्याचा प्रकार सुरू आहे.

नेरळ  - रिलायन्स प्रशासनाकडून कर्जत तालुक्यातील कोदिवले-बिरदोले येथील शेतकºयांना नोटीस पाठवून धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत त्या शेतकºयांसोबत मोबदला तसेच भविष्यातील धोका याविषयी कोणतीही माहिती न देता थेट दलालांना शेतकºयांच्या घरी पाठवून पंचनामे करून घेण्याचा प्रकार सुरू आहे.कोदिवले-बिरदोले दोन्ही गावचे सर्व शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत रिलायन्स प्रशासन शेतकºयांशी चर्चा करत नाहीत व योग्य मोबदला देत नाहीत तोपर्यंत वाटेल ते झाले तरी पंचनाम्यावर सह्या करणार नाही. कोणत्याही प्रकारची चर्चा न करता चर्चा केल्याचे व कामात अडथळा आणल्याचे खोटे कारण नोटिसीत देऊन एकप्रकारे रिलायन्स प्रशासन शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. आज सर्व शेतकºयांना टपालाद्वारे नोटिसी पाठवून पीक नुकसानभरपाईसंदर्भात अवाढव्य भरपाई मागत असल्याचे नोटिसीत नमूद करून १९६३ च्या भूमिअधिग्रहण कायद्याचा हवाला देत कामात व्यत्यय आणल्यास कायदेशीर कारवाई करण्याची एकप्रकारे धमकी शेतकºयांना देण्यात आली आहे.डिसेंबर २०१७ मध्ये कोदिवले येथील तरुण शेतकºयांनी या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन शेतकºयांना योग्य मोबदला मिळावा म्हणून लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावर कोकण आयुक्तांकडे हे प्रकल्प सुपूर्द केले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले व त्यासंदर्भात लवकरच चर्चेसाठी शेतकºयांना बोलाविण्यात येईल, असे उत्तर कोकण आयुक्तालयातर्फे देण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनी रिलायन्सच्या घशात तटपुंजा मोबदल्यात जात असतील तर शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा शेतकºयांनी दिला आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहेत त्यांना विचारात न घेता दलाल, राजकीय पुढारी यांच्यासोबत वाटाघाटी करून शेतकºयांच्या पोटी मात्र उपेक्षाच आली आहे.रिलायन्स गॅस पाइपलाइनसंदर्भात ज्या नोटीस शेतकºयांना पाठविल्या जात आहेत यांची आम्हाला कल्पना नाही. त्या त्यांच्या कार्यालयातून परस्पर पाठविल्या जात आहेत. जर काही तक्र ारी आल्यास आम्ही शेतकºयांना रिलायन्स प्रशासनाकडे या संदर्भात योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवितो.- अविनाश कोष्टी, तहसीलदार कर्जतरिलायन्स प्रशासनाचा खोट्या नोटिसी पाठवून कायद्याचा धाक दाखविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला आहे त्याचा काहीही परिणाम शेतकºयांवर होणार नाही. कोदिवले-बिरदोले तसेच तालुक्यातील शेतकरी योग्य मोबदला तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही पंचनाम्यावर सह्या करणार नाहीत किंवा दबावशाहीला घाबरणार नाही. ज्या कायद्याचा हवाला देत रिलायन्सने नोटीस पाठवली तो कायदा २०१५ साली केंद्र सरकारने बदल केला असून शेतकºयांच्या हिताचा कायदा पास केला आहे. प्रकल्पात जाणाºया जमिनीचा सध्याच्या बाजारभावानुसार मोबदला देणे आवश्यक आहे.- भास्कर तरे, शेतकरी -कोदिवले

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड