शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

कर्जतमधील पाणी योजना अपुऱ्या; २०३१ पर्यंत पाणी पुरेल अशी योजनाही पडली तोकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:06 IST

कर्जतकरांची २२ वर्षांपासून रखडलेली पाणी योजना नागरिकांची सततची मागणी आणि ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे २००६ साली पूर्ण झाली. त्यामुळे कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळू लागले.

- विजय मांडेकर्जत : कर्जतकरांची २२ वर्षांपासून रखडलेली पाणी योजना नागरिकांची सततची मागणी आणि ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे २००६ साली पूर्ण झाली. त्यामुळे कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळू लागले. ही योजना २०३१ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी करण्यात आल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते; परंतु सध्या कर्जतमध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे ही योजना आताच अपुरी पडू लागली आहे. वेळेत नवीन पाणी योजना सुरू करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल,त्यामुळे विकासकामांबरोबरच लवकरात लवकर नवीन पाणी योजना मंजूर करण्याची व ती प्रत्यक्षात उतरविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.कर्जत आणि दहीवली ग्रामपंचायत असताना पळसदरी की पेज नदी पाणी योजना यावरून कर्जत शहरात आंदोलने, उपोषणे झाली. या दोन्ही योजनांबद्दल दोन गट आग्रही होते. काहींनी या योजना प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. अखेर कर्जत ग्रुप ग्रामपंचायतीला पळसदरी तलावावर आधारित आणि दहीवली ग्रामपंचायत आणि १९ गावांना पेज नदीवर आधारित पाणी योजना मंजूर होऊन त्या कार्यान्वित झाल्या. कालांतराने पळसदरीची पाणी योजना अपुरी होऊ लागली आणि नंतर कर्जतसाठी पेज नदीची पाणी योजना मंजूर करावी, असा आग्रह ज्यांनी पळसदरी योजनेसाठी केला होता त्यांनी सुरू केला.१९९२ मध्ये कर्जत नगरपालिकेची स्थापना झाली. कर्जत ग्रुप ग्रामपंचायत, दहीवली ग्रामपंचायत आणि शिरसे ग्रामपंचायतीतील आकुर्ले गावाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला, त्यामुळे चांगल्याप्रकारे पाणीपुरवठा होणे गरजेचे होते.१९९४ साली नगरपरिषदेची पहिल्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली. त्या वेळी कर्जतची लोकसंख्या २० हजार ९९ होती. वाढीव ९९ लोकसंख्येमुळे पाणी योजना मंजुरीसाठी दहा टक्के लोकवर्गणी भरावी लागणार होती. १९९५ साली राज्यात सत्तांतर झाले. युतीची सत्ता आली. पाणी योजनेसाठी पक्षभेद बाजूला ठेवून नगराध्यक्ष धनंजय चाचड यांनी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम, अशोक मोडक, नगरविकासमंत्री रवींद्र माने, ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे, आदीच्या प्रयत्नाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना शिष्टमंडळ भेटले. त्यांनी नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती जाणून घेऊन कर्जतची पाणी योजना १०० टक्के निधी देऊन मंजूर करण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी २०३१ च्या लोकसंख्येचा विचार करून १४ कोटी १३ लाख रु पयांची पाणी योजना मंजूर झाली. पाणी योजनेचे काम सुरू झाले. जेमतेम सात टक्के काम झालेले असताना १९९९ मध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. काँग्रेस आघाडीचे सरकार आले. युती शासनाने मंजूर केलेल्या पाणी योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक धोरण राबविले. ज्या योजना पूर्णत्वाकडे आहेत त्यांना आधी निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले. कर्जतच्या पाणी योजनेचे काम केवळ सातच टक्के झाल्याने योजनेला निधी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि योजना रखडली.पालकमंत्री सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नाने आर. आर. पाटील यांनी पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. अखेर २००६ मध्ये कर्जतच्या वेशीवर पाणी आले.झपाट्याने नागरीकरण होत असल्याने २०३१ पर्यंत मुदत असलेल्या पाणी योजनेचे पाणी १५ वर्षे आधीच कमी पडू लागले. शहराच्या टोकाला असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. १२-१३ वर्षांपूर्वी केलेल्या योजनेच्या सदोष जलवाहिन्यांमुळे निम्म्याहून अधिक पाणी गळतीमुळे वाया जात होते. मध्यंतरी दुरु स्ती केल्याने गळती थांबली आहे; परंतु जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे. पेज नदीवरील पंप बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असला तरी त्यामुळे शहरातील पाण्याची निकड भागण्यासारखी नाही. त्यासाठी नवीन पाणी योजना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोंढाणे धरणातील पाण्याची अपेक्षा करण्यापेक्षा नव्या पाणी योजना सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.सह्यांची मोहीम राबविलीकर्जतची रखडलेली पाणी योजना मार्गी लागण्यासाठी पाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ‘लोकमत’ने त्या काळी ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्र म हाती घेतला. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सातत्याने तीन वर्षे पाणीमेळावे आयोजित करण्यात आले.मेळाव्यांना कर्जतकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पाणी योजनेच्या प्रगतीची माहिती प्रत्येक महिन्याच्या २३ तारखेला देण्याचे शेवटच्या पाणी मेळाव्यात ठरविण्यात आले आणि पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर विजयी पाणी मेळावा आयोजित करण्याचे ठरले. सह्यांची मोहीम राबविली.

टॅग्स :Waterपाणी