शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

आपत्ती व्यवस्थापनाला निधीची कमतरता, प्रशासनाचे निधीसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 07:00 IST

नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हात बळकट करताना राज्य सरकार कमी पडले आहे. ‘कपॅसिटी बिल्डिंग’साठी गेल्या तीन वर्षांत ५० लाख रुपयांचा निधीच त्यांनी वितरित केलेला नाही.

- आविष्कार देसाईअलिबाग : नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हात बळकट करताना राज्य सरकार कमी पडले आहे. ‘कपॅसिटी बिल्डिंग’साठी गेल्या तीन वर्षांत ५० लाख रुपयांचा निधीच त्यांनी वितरित केलेला नाही. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला विविध कार्यक्रम राबवणे, कठीण झाले आहे. राज्य सरकारमार्फत जिल्ह्याच्या वाट्याचा निधी तातडीने मिळावा, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.रायगड जिल्हा हा संवेदनशील जिल्हा आहे. याच भागामध्ये विविध केमिकल कंपन्यांचे जाळे उभारण्यात आलेले आहे. नऊ रत्न कंपन्यांपैकी आरसीएफ, ओएनजीसी, एपीसीएल, गेल, एचपी अशा महत्त्वाच्या कंपन्या याच रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये शेतीचे क्षेत्रही बºयापैकी तग धरून आहे. त्याचप्रमाणे याच जिल्ह्यातून मुंबई-पुणे हा एक द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वे, असे महत्त्वाचे मार्ग आहेत. हे मार्ग बाराही महिने वाहतुकीने व्यस्त असतात. यासर्व बाबींचा विचार करता कोणत्याही क्षणी मोठी आपत्ती ओढवू शकते. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतीसह, मासेमारीलाही अधून-मधून बसत असतो. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येण्याचे प्रमाणही येथे दखल घेण्या इतके आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी अलिबाग या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे.आपत्तीच्या घटनांचा आढावा घेणे, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ग्रामपंचायतींना, तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन करणे, मॉकड्रिल घेणे, आपत्ती काळात योग्य समन्वय साधून घटनास्थळी मदत पाठवणे, कार्यशाळा घेणे, विविध जनजागृतीपर शिबिरे घेणे, अशी शेकडो कामे या विभागामार्फत करण्यात येतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला हे सर्व उपक्रम करण्यासाठी अथवा ‘कपॅसिटी बिल्डिंग’ करताना खर्च करावा लागतो. यासाठी सरकारकडून ठरावीक निधीची तरतूद केलेली असते. मात्र, हाच निधी वेळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला प्राप्त झाला नाही, तर आपत्ती व्यवस्थापन आपत्तीचा सामना कसा करणार? हा मोठा प्रश्न आहे.पुरेसा निधी नसल्याने अडचणनधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने कार्यशाळा, शिबिरे, ग्रामपंचायतींना आपत्तीच्या कालावधीत लागणारे, टॉर्च, लाइफ जॅकेट, दोरखंड असे विविध साहित्य यासाठी निधी अपुरा पडतो. त्यामुळे अडचण निर्माण होते, असेही पाठक यांनी स्पष्ट केले.निधी वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राज्य सरकारकडे प्रयत्न करीतआहे.

टॅग्स :Raigadरायगड