शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच क्रिशा जैन बनली वैमानिक, कर्जतकरांनी केले जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:22 IST

क्रिशाची तिच्या निवासस्थानापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानाजवळ जाताच तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

कर्जत : येथील एकोणीस वर्षीय क्रिशा दिनेश जैन परदेशात वैमानिक शिक्षण घेऊन परतली असून तिचे कर्जतकरांनी शनिवारी मिरवणूक काढून स्वागत केले. क्रिशा ही जैन समाजातील रायगड जिल्ह्यातील पहिलीच महिला वैमानिक आहे, असे  तिचे वडील दिनेश जैन यांनी सांगितले. सोमवारी ती पुढील प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे रवाना होणार आहे.

येथील जैन मंदिरात तिचा कौतुक सोहळा करण्यात आला. याप्रसंगी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी सरपंच मधुकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान चंचे, युवक शहराध्यक्ष सोमनाथ पालकर, उद्योजक सुभाष सावंत, जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष जयंतीलाल परमार, चंद्रकांत डागा आदी उपस्थित होते. क्रिशाची तिच्या निवासस्थानापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानाजवळ जाताच तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

सातवीत असताना पाहिले स्वप्नक्रिशा ही कर्जत शहरातील दिनेश प्रेमचंद जैन व संगीता जैन यांची कन्या. तिचे आजोळ चेन्नईत आहे. सातवीची परीक्षा दिल्यानंतर विमानाने ती आजोळी जाण्यास निघाली. तेव्हा तिने मीसुद्धा वैमानिक होणार असे आपल्या आई-वडिलांना सांगितले होते.

३२७ यशस्वी उड्डाणे५ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील टू फ्लाय एअर संस्थेत वैमानिक शिक्षण घेण्यासाठी ती गेली होती.जिद्द व मेहनतीच्या जोरावर अवघ्या सात महिन्यांत ती वैमानिक परीक्षेत उत्तीर्ण झाली. या कालावधीत तिने एकूण ३२७ यशस्वी विमान उड्डाणे केली आहेत. १९ डिसेंबर २०२२ रोजी तिच्या प्रशिक्षणाच्या अवघ्या सव्वा महिन्याच्या कालावधीत तिने एकाच दिवसात तब्बल १२ विमान उड्डाणे केली.

मुलींनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. विविध क्षेत्रांत त्यांना अनेक संधी आहेत. तेथे युवतींनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर आपला ठसा उमटविला पाहिजे. त्यासाठी समाज व कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. मला समाज व कुटुंबाने पाठिंबा दिल्याने नवे अवकाश खुले झाले.    - क्रिशा दिनेश जैन

टॅग्स :Karjatकर्जत