शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुडगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:57 IST

श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या प्रमिला मेंदाडकर व ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या प्रमिला मेंदाडकर व ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरताना देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी श्रीवर्धन तहसीलदारांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे.कुडगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये सरपंच पदासाठी खुल्या प्रवगार्तून प्रमिला मेंदाडकर यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी स्थावर मालमत्तेचा तपशील देताना आपल्याकडे कोणत्याही प्रकारे संयुक्त मालकीची किंवा मालकीची जमीन नसल्याचे नमूद केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांचे पती विनोद यांच्या नावे मौजे कुडगाव व हरवीत येथे मालकीची जमीन असल्याचे तक्रारदार एजाज हवालदार यांनी पटवून दिले.तर, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांनी कोणत्याही प्रकारे फौजदारी गुन्हे दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले होते. परंतु त्यांच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून याबाबत सदर निकाल न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.याविरोधात कुडगाव येथील माजी उपसरपंच एजाज हवालदार यांनी जिल्हाधिकाºयांकडे दिलेल्या तक्रारीची शहानिशा व पूर्ण चौकशीअंती रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी श्रीवर्धन तहसीलदारांना प्रमिला मेंदाडकर व जगन्नाथ खरगावकर यांच्या विरोधामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून संबंधित मंडळ अधिकारी सुनील मोरे यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.कित्येक महिने प्रलंबित असलेली तक्रार ‘आपले सरकार’ या अ‍ॅपच्या मदतीने तत्काळ निकाली निघाली. या निकालामुळे निवडणूक नामनिर्देशन भरताना खोटी माहिती भरणाºयांना जरब बसेल.- एजाज हवालदार, माजी सरपंच (तक्रारदार)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी