पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; मलमपट्टीसाठी सा. बांधकाम विभागाचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:09 AM2020-12-04T01:09:26+5:302020-12-04T01:09:32+5:30

वाहनचालक नाराज, या वर्षीदेखील या मार्गावर दरड कोसळून काही दिवस हा मार्ग बंद होता. संचारबंदीनंतर हा मार्ग सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी हा घाट वाहनचालकांसाठी धोकादायकच बनला आहे.

Kingdom of Pits on Poladpur - Mahabaleshwar Road; Sa for dressing. Construction department costs | पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; मलमपट्टीसाठी सा. बांधकाम विभागाचा खर्च

पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; मलमपट्टीसाठी सा. बांधकाम विभागाचा खर्च

googlenewsNext

दासगाव : महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हा मार्ग खराब झाला असला तरी सालाबादप्रमाणे पोलादपूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून मलमपट्टी करण्याचे काम जोमाने सुरू आहे. यामुळे वाहनचालक या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

महाबळेश्वर या थंड हवेच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी पोलादपूरपासून सुमारे ४० किमीचा मार्ग आहे. हा संपूर्ण घाट मार्ग असून वाडा या गावापर्यंतचा मार्ग महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. पोलादपूर ते वाडा यादरम्यानच्या घाटाला ‘आंबेनळी घाट’ म्हणूनदेखील बोलले जाते. या मार्गावर ऐन पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने होत असतात. यामुळे मार्गाची दुरुस्ती, संरक्षक कठडे बांधणे, रेलिंगची कामे आदी कामे प्रति वर्षी केली जात आहेत. याकरिता लाखो रुपये खर्च केले जात असले तरी ही कामे कधीच न संपणारी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पोलादपूरकरिता हा मार्ग म्हणजे कुरणच बनला आहे.

या वर्षीदेखील या मार्गावर दरड कोसळून काही दिवस हा मार्ग बंद होता. संचारबंदीनंतर हा मार्ग सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी हा घाट वाहनचालकांसाठी धोकादायकच बनला आहे. सध्या या मार्गावर डांबराची मलमपट्टी करण्याचे काम सुरू असून हे कामदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानेच सुरू असल्याने वाहनचालक या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हा मार्ग खराब झाला असला तरी सालाबादप्रमाणे पोलादपूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून मलमपट्टी करण्याचे काम जोमाने सुरू आहे. यामुळे वाहनचालक या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी मार्गाची चाळण झालेली असताना डांबर मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. प्रतापगडपासून महाडकडील मार्गावर डांबर टाकून पॅच मारले जात आहेत. तीव्र उताराचा घाट असल्याने वाहनांच्या टायरचे घर्षण मोठ्या प्रमाणावर होऊन नुकत्याच मारलेल्या पॅचवरील डांबरदेखील निघून जाऊन खडी दिसू लागली आहे. तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकीस्वारांना या खडीचा त्रास होऊ लागला आहे. वाहने घसरून अपघात होण्याची भीतीदेखील वाहनचालकांना वाटत आहे.

दरीचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका 
महाबळेश्वर घाटातील प्रतापगड वाडापर्यंत महाड सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द आहे तर पुढील भाग हा सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. हा संपूर्ण घाट मार्ग असल्याने या ठिकाणी कामाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. 
दोन्ही विभागांकडून कामांकडे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या दरीच्या बाजूने उभ्या केलेल्या रेलिंगला अद्याप रेडिअम पट्टी लावण्यात आलेली नाही. यामुळे रात्रीप्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दरीचा अंदाज येत नाही.
 

Web Title: Kingdom of Pits on Poladpur - Mahabaleshwar Road; Sa for dressing. Construction department costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.