शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खोपोली-पेण-पाली रस्ता, द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:07 IST

सलग सुट्टींमुळे गर्दी। चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

खोपोली : बुद्ध पौर्णिमा आणि रविवार अशा सलग सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका, पाली फाटा, पेण रस्ता, पाली रस्ता येथे शनिवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात शाळा-कॉलेजलाही सुट्टी असल्याने वाहनांच्या संख्येत भर पडली होती. पाली फाट्यावर असलेले खड्डे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत होते. एकूणच सुट्टीसाठी मौजमजा करण्यासाठी निघालेले प्रवासी मात्र चार ते पाच तास वाहतूककोंडीत अडकल्याने हैराण झाले होते.

द्रुतगती मार्गावर चार ते पाच कि.मी., खोपोली-पेण रस्त्यावर पाली फाटा ते सारसन व पेण बाजूकडे वडखळपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. पाली रस्त्यावर अ‍ॅडलॅबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी कोकणात, अ‍ॅडलॅब, अष्टविनायक आणि अलिबागच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहने खोपोली-पाली-पेण रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. त्यात स्थानिक वाहनांची ये-जा होती, त्यामुळे वाहतूककोंडी झाली. या वेळी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, महामार्ग पोलीस यंत्रणेचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग किसवे आदींनी वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले.अंकित साखरे, संदेश चौधरी यांनी वाहतूककोंडीत आडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. बोरघाटात अमोल कदम, मितेश शहा यांनी मदतीचा हात दिला. पाली फाटा येथे खोपोली-पेण मार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते, त्यामुळे ही वाहतूककोंडी दूर होण्यास वेळ लागत होता. एपीआय शेलारांनी घटनास्थळी आयआरबीचे गांधी व इतर अधिकाऱ्यांसह पाहणी केली. आयआरबीकडे रस्ता नसतानाही त्यांनी तत्काळ खड्डे भरून देण्यास सुरुवात केली.