शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी २००० क्विंटल बियाण्यांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:47 IST

शेतात केलेल्या धूळवाफ्यावर धूळपेरणीसाठी बियाण्यांची जमवाजमव करण्यासाठी ते थेट कृषी केंद्रावर धाव घेऊ लागले आहेत.

पेण : येत्या आठ-दहा दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची तयारी करण्यात गुंतले आहेत. शेतात केलेल्या धूळवाफ्यावर धूळपेरणीसाठी बियाण्यांची जमवाजमव करण्यासाठी ते थेट कृषी केंद्रावर धाव घेऊ लागले आहेत.पेणमधील १८ हजार १०० हेक्टर लागवड क्षेत्रासाठी ३००० क्विंटल सुधारित व संकरित बियाण्यांची एकूण मागणी आहे. त्यापैकी कोकण विकास कृषी केंद्रावर २००० क्विंटल बियाण्यांची आवक उपलब्ध झाली असून, ती सर्व बियाण्ी पेण शहरासह ग्रामीण विभागातील २२ केंद्रांवर पोहोच करण्यात आल्याचे कोकण कृषी विकास केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.पेण तालुक्यातील खरीप हंगाम २०१८साठी तालुका कृषी विभागाने ३००० क्विंटल बियाण्यांपैकी सध्या कोकण कृषी विकास सेवा केंद्रावर २००० क्विंटल बियाण्यांची आवक उपलब्ध झाली आहे. यामध्ये विविध जातीची बियाण्ी असून नव्वद, शंभर, एकशेवीस दिवसांत तयार होणाऱ्या व भरघोस उत्पन्न देणाºया भात बियाण्यांच्या प्रजातीचा समावेश असून त्या पाच, सहा, दहा, बारा व पंचवीस किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. प्रकारानुसार ८५० रुपये, ९०० रुपये, ९५० रुपये अशा किमती असून दरवर्षीप्रमाणेच बियाण्यांच्या किमती आहेत.शेतकºयांसाठी सर्वत्र बियाणी उपलब्ध असून पेण, वडखळ, शिर्की, वढाव, आमटेम, कामार्ली, कळके, तांबडशेत, वरसई, खरोशी या ठिकाणच्या सर्व कृषी सेवा केंद्रावर बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संकरित व सुधारित बियाण्यांच्या खरेदीसाठी त्या-त्या केंद्रावर बियाणी खरेदी करावीत, याशिवाय पेण शहरात कोकण कृषी विकास केंद्र, पेण खरेदी-विक्री संघ, समर्थ बियाणे केंद्र, के. एन. वैरागी व सह्याद्री बियाणे केंद्रावर सर्व प्रकारातील बियाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तालुका कृषी अधिकारी निंबाळकर व पेण पं. समितीचे कृषी अधिकारी यांनी बियाण्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी घेतले आहेत. एकंदर खरीप हंगाम २०१८ची जय्यत तयारी सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी