शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांपासून प्रदूषण थांबविण्यासाठी खारघर टोल स्प्रेईंग यंत्रणा, आजपासून यंत्रणा कार्यान्वित

By वैभव गायकर | Updated: November 10, 2023 20:15 IST

नजीकच्या काळात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: मुंबई महानगरपरिसरात नजीकच्या काळात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.याबाबत शासनाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर प्रदूषणकारी अवजड वाहनांवर खारघर टोल नाक्यावर पाण्याची फवारणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली. आजपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक गावी जात आहेत.सणासुदीच्या काळात प्रदूषणाचा घातक परिणाम नागरिकांवर होऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्याचाच भाग म्हणून खारघर कोपरा टोल नाक्यावर अवजड वाहनांमधून अथवा वाहनांमुळे हवेत उडणारे धुळीचे कण कमी व्हावेत यादृष्टीने टोल नाक्यावर स्प्रेईंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.यामुळे वाहनांवर पाण्याची फवारणी केली जाणार आहे.यामुळे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण येणार आहे.पुढील तीन ते चार दिवस हि यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.जेएनपीटी बंदर ,एपीएमसी,स्टील मार्केट,तळोजा एमआयडीसीसह इतर राज्यात जाणारी वाहने बहूतांशी या मार्गातुन येजा करीत असतात.शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेने हि यंत्रणा उभारली आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेलpollutionप्रदूषण