शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खारभूमी विभागाने केला संरक्षक बंधाऱ्यांचा पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 00:55 IST

चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली.

अलिबाग : चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात तब्बल २४ ठिकाणचे संरक्षक बंधारे उद्ध्वस्त झाले होते. येणारी आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मेहनतीने ते बंधारे बांधले होते. आता खारभूमी विभागाने जागेवर जाऊन पंचनामा केल्यामुळे कामाचे अंदाजपत्रक लवकरच तयार होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.‘रोजगार हमी योजनेतील मजुरी अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा’ या मथळ््याखाली लोकमतने सर्वप्रथम चरी आणि शहापूरमधील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. वृत्त प्रसिद्ध होताच खारभूमी विभागाचे अधिकारी तातडीने चरी आणि शहापूर गावात पोचले.आॅगस्ट महिन्यात चरी येथील तीन आणि शहापूर येथील २१ बंधारे अतिवृष्टीने समुद्राला आलेल्या उधाणाच्या पाण्याने फुटले होते. त्यातील बंधारे ग्रामस्थांनी बांधले होते. त्याची पाहणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे नव्याने फुटलेल्या बंधाºयांचा पंचनामा त्यांनी केला.आपत्तीमुळे फुटलेले संरक्षक बंधारे ग्रामस्थांनी बांधले होते. हे काम रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून केलेल्या कामाची मजुरी ग्रामस्थांच्या खात्यात वर्ग करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली होती. मात्र, खारभूमी उपअभियंता आणि अलिबागचे तहसीलदार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम संबंधित अधिकाºयांच्या पगारातून वसूल करावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे कामचुकार अधिकाºयांची तातडीने बदली करावी अशीही मागणी करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासन आणि खारभूमी विभाग खडबडून जागे झाले. खारभूमी विभागाने तातडीने घटनास्थळी आता धाव घेतली आहे. गावातील फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची पाहणी खारभूमी विभागाचे कनिष्ठ अभियंता एम. जी. पाटील आणि शुभम चव्हाण यांनी केली. तसेच ग्रामस्थांनी कोणते बंधारे उभारले आहेत त्याबाबतचे मोजमाप आमच्याकडून घेतल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अधिक माहितीसाठी खारभूमी विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांच्याशी संपर्क झाला नाही.>गावात नव्याने चार संरक्षक बंधारे फुटले आहेत. त्यातील एका बंधाºयाचे मोजमाप करण्याचे काम सुरू होते. हा बंधारा सुमारे ३० फुटांहून अधिक फुटला आहे. खारभूमी अधिकाºयांना त्याचे मोजमाप करताना मीटरपट्टीची टेप कमी पडली. त्यामुळे दोन वेळा मोजमाप करावे लागले. यावरूनच बंधारा किती मोठ्या प्रमाणात फुटला असेल याची गंभीरता दिसून येते, असेही श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी स्पष्ट केले.