शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४९ वर्षांनी सरकारचे खारभूमी विकास मंत्री खारेपाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:20 IST

अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली होती.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटात १९६९ मध्ये तत्कालीन खारभूमी विकास मंत्री अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी प्रत्यक्ष फिरून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समुद्र संरक्षक बंधारे बांधून खारेपाटातील भातशेती संरक्षित करण्याकरिता राज्य सरकारकडे योजना सादर केली होती. त्यानंतर याच खारेपाटातील हजारो एकर भातशेती संरक्षक बंधारे फुटून खाºया पाण्याखाली जावून नापिकी झाली. परंतु ४९ वर्षांच्या कालखंडात कोणत्याही राज्य सरकारचे खारभूमी विकास मंत्री या खारेपाटात फिरकले नाहीत.तब्बल ४९ वर्षांनी राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात येवून मानकुळे, सोनकोठा, हाशिवरे, पोफेरी आणि नवीन मिळकत या खारभूमी योजनांची खारभूमी विकास विभागाच्या अधिकाºयांसमवेत पाहणी केली. याबद्दल खारेपाटातील शेतकºयांनी आनंद व्यक्त केला आहे.मात्र खारभूमी विकास मंत्री रावते यांनी या त्यांच्या दौºयात संरक्षक बंधारेफुटीच्या समस्येने ग्रस्त शेतकºयांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली असती तर अधिक आनंद झाला असता. समस्याग्रस्त शेतकºयांना ‘आपले सरकार’ बरोबर प्रत्यक्ष खारभूमीच्या अडचणी, आपत्कालीन योजना व व्यवस्थापन, रोजगाराच्या संधी आणि खारेपाटातील शेतकºयांनीच तयार केलेला नावीन्यपूर्ण समृद्ध खारेपाटाचा पथदर्शी प्रकल्प याबाबत बोलता आले असते, अशी भूमिका या दौºयाच्या निमित्ताने श्रमिक मुक्ती दलाच्या महिला शेतकरी प्रतिनिधी मधुरा भास्कर पाटील आणि सुधा राजन भगत यांनी रविवारीच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.खारभूमी विकास विभागाच्या अधिकाºयांनी खरेतर या दौºयाबाबत माहिती शेतकºयांना देणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी देखील ती दिली नाही. जिल्हाधिकारी या नात्याने आपण खारभूमीच्या प्रश्नाबाबत खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीचे आयोजन केले तर खारभूमीच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होवून अनुत्पादक खारजमिनी पुन्हा उत्पादक होवू शकतात.त्याचबरोबर पालकमंत्री पाणंद रस्ते, भात खाचरातील मत्स्यशेती, विशेष जिताडा माशांचे उत्पादन,संरक्षक बंधाºयाला लागून सोलर वीजनिर्मिती यातून स्थानिक रोजगारांच्या संधी पुन्हा उपलब्ध होवू शकतात असा आमचा विश्वास असल्याचे या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.खारबांध बंदिस्ती नव्याने करण्याचे सूतोवाचखारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या रविवारच्या दौºयादरम्यान पाहणी करताना बंगलाबंदर ते हाशिवरेखार हा सुमारे साडे आठ किमी लांबीचा समुद्र संरक्षक बंधारा त्याचबरोबर माणकुळे खारबांध बंदिस्ती नव्याने करण्याचे सूतोवाच केले आहे. खारेपाटीतील फुटलेल्या संरक्षक बंधाºयांचा प्रश्न सोडविण्याकरिता सर्व ते प्रयत्न करण्यात येतील असेही सांगितले. दौºयात त्यांच्या समवेत खारभूमी विकास विभागाचे अधिकारी, रायगड जि.प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सरपंच सुजित गावंड आदि उपस्थित होते.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावते