शहरं
Join us  
Trending Stories
1
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
2
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
3
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
4
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
5
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
6
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
7
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
8
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
9
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
10
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
11
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
12
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
13
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
14
बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
15
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद
16
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
17
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
19
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
20
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन

परप्रांतीय कामगारांचे रेकॉर्ड खालापूर पोलीस तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:49 IST

  रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत बांगलादेशी घुसखोराला अटक केल्याची घटना ताजी असताना सर्वाधिक परप्रांतीय कामगारांचा भरणा असलेला खालापूर तालुक्यातही अशा प्रकारचे घुसखोर असण्याची शक्यता

- अमोल पाटीलखालापूर -  रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करीत बांगलादेशी घुसखोराला अटक केल्याची घटना ताजी असताना सर्वाधिक परप्रांतीय कामगारांचा भरणा असलेला खालापूर तालुक्यातही अशा प्रकारचे घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नसून, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी कारखान्यातील परप्रांतीय कंत्राटी कामगारांची माहिती मिळावी, यासाठी कारखाना व्यवस्थापकांना नोटिसा काढणार असल्याची माहिती दिली आहे. एबीटी या बांगलादेशी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून तीन दिवसांपूर्वी महाड येथून एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्याचे कारवाईत समोर आले होते. खालापूर तालुका कारखानदारीचा तालुका असून, लहान-मोठे जवळपास तीनशे कारखाने तालुक्यात आहेत. त्यातच तिसरी मुंबईच्या दिशेने तालुक्याची सुरू असलेल्या घोडदौडीमुळे परप्रांतीयांचा लोंढा दिवसेंदिवस वाढत आहे. पोलाद उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या जास्त असून, या ठिकाणी अवजड व धोकादायक काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून राबविले जाते. उत्तरप्रदेश, बिहार, कोलकाता, ओरिसा, आसामपासून जवळपास सर्वच राज्यांतील तरुण खालापूर तालुक्यातील विविध कारखान्यांत काम करीत आहेत. बहुतेक कारखान्यांत परप्रांतीय कामगारांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या असून, लहान खोल्यांमधून दहा ते बारा कामगार दाटीवाटीने राहत आहेत. तर कारखान्यालगत असलेल्या गावांतून भाडेकरू म्हणून परप्रांतीय कामगारांच्या वस्ती असून, भाडोत्री ठेवताना त्याची माहिती घरमालकाकडून घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. ठेकेदारामार्फत काम करणाºया परप्रांतीय कामगारांची निश्चित संख्या किती आहे, तसेच त्यांचे ओळखपत्र याबद्दल ठोस तपशील उपलब्ध व्हावा, यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक शेख यांनी माहिती गोळा करण्यासाठी कारखाना व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. पोलिसांनी उचलेले पाऊल स्वागतार्ह आहे.खालापूर तालुक्यात कारखाना, बांधकाम क्षेत्र तसेच विविध व्यवसाय, काम करणाºया परप्रांतीय कामगारांची संख्या जवळपास अर्धा लाख असण्याची शक्यता असून, मोहपाडा आणि महड येथून तीन वर्षांपूर्वी बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले होते.पोलीस पाटील यांच्या मार्फत हे काम गावागावांत करण्यात येणार आहे, तर कंपन्यामधील एचआर या विभागाकडून कामगारांची पूर्ण माहिती तपासली जाणार आहे. घरमालकांनी यामध्ये सहकार्य करावे, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.खालापूर तालुक्यात अनेक गुन्ह्यांत परप्रांतीय तरु णांचा सहभाग उघडकीस आला होता. परराज्यातून तडीपार गुंडांचा वावर खालापूर तालुक्यात असण्याची शक्यता आहे. कोणत्याही घटनेसाठी ही माहिती पोलिसांना उपयुक्त ठरते.

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगड