शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:42 IST

कर्जत तालुक्यात आदिवासी कातकरी या जमातीच्या विकासासाठी राबवायच्या उपक्र माच्या अनुषंगाने ‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

नेरळ : महाराष्ट्र शासनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार कर्जत तालुक्यात आदिवासी कातकरी या जमातीच्या विकासासाठी राबवायच्या उपक्र माच्या अनुषंगाने ‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्याच्या पातळीवर आदिवासीसाठी काम करणाºया वेगवेगळ्या संस्था संघटनांची यासाठी मदत घेऊन हे अभियान व्यापक व यशस्वी राबविण्याचा मानस कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी व्यक्त के ला. यामुळे लवकरच कातकरी समाजात आमूलाग्र बदल होऊन ते कात टाकतील, अशी आशा व्यक्त होत आहे.रायगड जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के इतकी लोकसंख्या आदिवासी समूहाची असून, महादेव कोळी, ठाकर आणि कातकरी या आदिवासी जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. यापैकी कातकरी ही जमात भारतीय संविधानाच्या सूची-पाचनुसार आदिम जमात म्हणून घोषित झाली आहे. या जमातीच्या उन्नतीसाठी आदिवासी विकास विभागासह सर्वच प्रशासकीय विभागांना वेगवेगळे उपक्रम राबविण्याच्या सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानुसारच महसूल विभागीय आयुक्त कोकण कार्यालय यांच्यामार्फत आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत कातकरी जमातीचे विविध मुद्दे आणि घटकांच्या आधारे सर्वेक्षण करण्यात येऊन आॅक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या समस्येच्या सोडवणुकीसाठी वेगवेगळे कॅम्प आयोजित करणे. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत कातक ºयांच्या रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमास प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची प्रवाही अंमलबजावणी करणे, असा कालबद्ध कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची मार्गदर्शन सभा शेळके सभागृहामध्ये नुकतीच घेण्यात आली. १८ आॅगस्ट रोजी तालुक्यातील आदिवासी समाजासाठी काम करणाºया संस्था-संघटनांची दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये बैठक आयोजित केली. कातकरी सर्वेक्षणामध्ये प्रशासनासोबत संघटनांच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.>विविध शिबिरांचे आयोजन करणारवनहक्क कायदा अंमलबजावणी, घराखालील जागेचा प्रश्न, शिक्षण, रोजगार, रेशन, पेन्शन, जातीचे दाखले, वयोवृद्धांचे दाखले आदी विषयांवर या सभेत चर्चा केली जाणार आहे. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत परिपूर्ण सर्व्हे करून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य तपासणी शिबिरे, जात प्रमाणपत्रे वाटप शिबिरे, घरपोच धान्य योजना, रेशन कार्ड वाटप शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.आदिवासी कातकरी बांधवांकडून माहिती गोळा करताना प्रत्येक कर्मचाºयाने सौजन्याने वागून माहिती गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.अशा प्रकारे कातकरी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण या समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.>प्रशासनाला सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत मिळाल्यामुळे वेळेत व परिपूर्ण सर्व्हे होईल, याबद्दल मला खात्री आहे. सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक गावाशी, आदिवासीवाडीशी प्रत्यक्ष संपर्क असतो, तसेच या कार्यकर्त्यांच्या कामावर लोकांचाही विश्वास असतो. यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपआपल्या पातळीवर या अभियानात सहभाग घेऊन कातकारी उत्थान अभियानात सहकार्य करावे.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत