शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात सात जणांमुळे रुग्णसंख्या ५८

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:33 IST

कर्जत तालुक्याच्या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कर्जत: कर्जत तालुक्याच्या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या आरोपी मुळे तेथील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात आणखी सात नवीन रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५८वर पोहचली आहे.कर्जत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपी असलेला आरोपी कर्जत तहसिल कार्यालयाच्या कोठडीत असताना कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्या २५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आरोपी तरुणाच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलोस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. तर एका पोलिसाची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली असून आता त्यात कर्जत पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलीस कर्मचारी यांची वाढ झाली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात बिनतारी संदेश विभागात काम करणाºया 36 वर्षीय पोलीस कर्मचारी यांचे कोरोना टेस्टचे अहवाल १९ जून रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. 40 वर्षीच्या आरोपीला नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत कोरोना झाला आहे. त्या आरोपीच्या संपर्कात आल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील एक ५६ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस उपनिरीक्षकांच्या संपर्कात आलेल्या अनेक पोलीसांना कोरोन्टाइन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना कोरोना ची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे पोलीस दलाचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. कर्जत तहसिल कार्यालयात यापूर्वी पुरवठा अधिकारी पदावर काम करणारे ५५ वर्षीय महसूल विभागातील नायब तहसीलदार यांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या