शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत रेल्वे स्थानकातील सरकता जिना ३0 जूनअखेर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:33 IST

कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर मुंबई दिशेकडे सुरू असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर मुंबई दिशेकडे सुरू असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे अशी माहिती कर्जत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकज ओसवाल यांना मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी ३१ मार्च २0१८ पर्यंत या सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होऊन प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तविली होती त्यामुळे जून अखेर तरी काम पूर्ण होते की नाही याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.कर्जत रेल्वे स्थानकावरील फलाट क्र मांक दोनवर सुमारे तीस लाख रु पये खर्च करून स्थानकातील पहिला सरकता जिना उभारण्यात येत आहे. त्याच्याच बाजूला मुंबई दिशेकडे उतरणाऱ्या जिन्याच्या पायºयांचे काम सुरू आहे. सरकत्या जिन्याचे काम जोरात सुरू आहे तर बाजूच्या जिन्याचे काम गेल्या चार - साडेचार वर्षांपासून सुरू आहे. सरकत्या जिन्याच्या कामाबद्दल पहिल्यांदा विचारले असता २0१८ मार्च अखेर काम पूर्ण होण्याची शक्यता कळविली होती. परंतु काम पूर्ण न झाल्याने ओसवाल यांनी पुन्हा प्रश्न विचारला असता आता २0१८ जून अखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे लेखी उत्तर ओसवाल यांना रेल्वे प्रशासनाने दिले आहे.गेल्या चार - साडेचार वर्षांपासून सुरू असलेले मुंबई दिशेकडील पायºयांच्या कामाबद्दल सुद्धा रेल्वे प्रशासनाने सारखे शक्यतांचे वायदेच दिले आहेत. सुरु वातीला २0१८ मार्च अखेर पायºयांचे काम पूर्ण होण्याची शक्यता सांगितली होती. मात्र आता २0१८ मे अखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचा वायदा केला आहे. वास्तविक पाहता पायºयांचे काम पूर्ण होऊन काही प्रवासी त्यामधून वाट काढीत अडथळे पार करीत जिन्यावरून जातात, परंतु जिना संपल्यानंतर जी जुनी भिंत आहे ती काढल्यानंतरच या पायºयांचा मार्ग खुला होईल. आज आतासुद्धा ती भिंत तशीच असल्याने मे अखेर तरी या पायºयांचा मार्ग खुला होऊन जिन्याचा वापर सुरू होईल ना? याकडे कर्जतकर रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.