शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

राष्ट्रवादीच्या शिबिराने तापले कर्जतचे राजकारण

By विजय मुंडे  | Published: December 02, 2023 1:20 PM

Karjat News: पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, निर्धार सभा, अजित पवार यांचा रोड शो आणि पक्षाचे चिंतन शिबिर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मावळ लोकसभेसाठी महायुतीत दबाव निर्माण करत असल्याचे गेल्या तीन दिवसांत दिसून आले.

- विजय मांडेकर्जत - पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, निर्धार सभा, अजित पवार यांचा रोड शो आणि पक्षाचे चिंतन शिबिर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मावळ लोकसभेसाठी महायुतीत दबाव निर्माण करत असल्याचे गेल्या तीन दिवसांत दिसून आले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांची तयारी हे पक्षाचे खरे लक्ष्य असल्याचेही यावेळी दिसून आले.   या शिबिरानिमित्ताने राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली. अजित पवार यांच्या  रोड शो निमित्ताने जवळपास ४२ वर्षांनी कर्जत शहरात अशी मोठी मिरवणूक निघाली.

मावळमधून २०१९च्या निवडणुकीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. सध्या शिंदे गटात असलेल्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. पण कर्जत मतदारसंघातून पार्थ यांना १८५० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय  होईल, असे चित्र होते. परंतु शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी त्यावेळचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांचा १८,५०० मतांनी पराभव केला. त्या राजकारणाची बराच काळ चर्चा सुरू होती. 

कुणाची सरशी?राष्ट्रवादीने जोर लावलेला असतानाच विद्यमान आमदार महेंद्र थोरवे शिंदे गटात आहेत. या मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार सुरेश लाडही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर भाजपत प्रवेश करतील. तेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीची माळ महायुतीतील कुणाच्या गळ्यात पडणार, हा प्रश्नच आहे.

 मंथन शिबिरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागांची घोषणा केली; पण मावळच्या जागेवर दावा सांगितला नाही. ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे ती हवी असल्यास राष्ट्रवादीला बरेच प्रयत्न करावे लागतील.   कर्जत विधानसभेच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षांत प्रचंड चढाओढीची शक्यता आहे. निर्धार सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतलेले सुधाकर घारे यांच्या नावे कार्यकर्त्यांनी वेळोवेळी घोषणा दिल्या. त्यावेळी पवार यांनी, तुमच्या घोषणा मला कळतात; पण हे सारे लोकसभा निवडणुकीनंतर होईल, असे सांगून विधानसभेचा विषय पुढे ढकलला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही घारे हे नवे नेतृत्व पुढे येत आहे. त्यांना रायगडचे नेतृत्व करायचे आहे, असे सांगून टाकले. 

टॅग्स :Karjatकर्जतNCPराष्ट्रवादी काँग्रेस