शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:32 IST

दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : एकीकडे भाऊचा धक्का- मोरा सागरी प्रवासी तिकिट दरात सप्टेंबरपासून २५ रुपये कमी होणार असतानाच दुसरीकडे करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवासासाठी तिकिट दरात १० रुपये वाढीची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली आहे. दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करंजा करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी मार्गावरुन प्रवासासाठी पावसाळी हंगाम वगळता दररोज सुमारे १२०० ते १५०० प्रवासी प्रवास करतात.अवघ्या २० मिनिटांत रेवस आणि त्यानंतर तासाभरात अलिबाग गाठता येत असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.त्याशिवाय कोकणाकडे जाण्याचा शार्टकट म्हणूनही हा सागरी मार्गावर ओळखला जातो.

रस्त्याने एसटी अथवा इतर वाहनांतून अलिबाग गाठणे खार्चिक आणि अधिक वेळ लागतो.यामुळे कोणताही हंगाम असो या  करंजा -रेवस सागरी मार्गावरुन मुंबईतुन अलिबाग मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी नाही.तसेच अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बहुतांश शासकीय विभागांची मुख्यालये ही अलिबागमध्येच आहेत.त्यामुळे विविध शासकीय विभागांच्या कामांसाठी नागरिकांना अलिबाग गाठावे लागते. यामुळे करंजा -रेवस सागरी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.यामुळे या सागरी मार्गावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. करंजा-रेवस या सागरी मार्गावर सध्या आर.एन. शिपिंग आणि आर.के.बोटींग या खासगी दोन कंपन्यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी बंदर विभागाने दिली आहे.सध्या प्रवासी संख्या रोडावली आहे.सध्या तिकिट दर २० रुपये आहे.मात्र महागाई वाढत चालली असल्याने इंधनाच्या दरातही भरमसाठ वाढ होत चालली आहे.त्यामुळे  वाहतुक खर्चातही वाढ झाली आहे.

यासाठी सप्टेंबरपासून तिकीट दरात १० रुपये वाढ करुन देण्याची मागणी बंदर विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती आर.के.बोटींगचे मालक राकेश कोळी यांनी दिली.मात्र तिकिट दरात वाढ करण्यासाठी बंदर विभागाने अद्यापतरी मंजुरी दिलेली नाही.मात्र मंजुरी मिळाली तर सप्टेंबरपासूनच करंजा -रेवस सागरी मार्गावरील प्रवासी तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता करंजा बंदर निरीक्षक देविदास जाधव यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड