शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

कळंबोली - जेएनपीटी मार्गाला अनधिकृत पार्किंगचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:31 IST

नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे.

पनवेल : नवी मुंबईत सध्याच्या घडीला वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अतिशय तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेकांचे परवाने देखील रद्द करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आली आहे. वाहतुकीस शिस्त लागण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र कळंबोली-जेएनपीटी मार्गावरच अवजड वाहने पार्क करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.कळंबोली सर्कल याठिकाणाहून दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. ही वाहने अनेकदा महामार्गावरच उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने वाहन चालक वाहनांच्या केबिनमध्ये अथवा कंटेनरमध्ये चूल पेटवून जेवण बनवताना दिसतात. कळंबोली-जेएनपीटी मार्गाच्या रुंदिकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता बदलण्यात आला आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळी वाहने उभी आहेत की चालू आहे, हे लक्षात येत नसल्याने चालक संभ्रमात असतात.कळंबोली मॅकडोनाल्डसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतूक होत असते. खासगी वाहनबंदी असताना देखील याठिकाणी बिनदिक्कतपणे उभी असतात. या मार्गावरील दोन लेन अनधिकृत वाहनांनी व्यापल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो.जिथे रस्त्याचे काम चालू नाही, तिथे ही वाहने थांबत असतात. अशा वाहनांवर आम्ही कारवाई करत असतो.- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक पोलीस

टॅग्स :Parkingपार्किंगpanvelपनवेलroad transportरस्ते वाहतूक