शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत पोस्टाच्या भूखंडांवर वाढले जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:58 IST

कळंबोली वसाहतीत भव्य-दिव्य स्वरूपाचे पोस्ट कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्याकरिता सिडको कार्यालयाच्या समोरचा चार हजार चौरस मीटरचा भूखंड दिला आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : कळंबोली वसाहतीत भव्य-दिव्य स्वरूपाचे पोस्ट कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्याकरिता सिडको कार्यालयाच्या समोरचा चार हजार चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. ही जागा पोस्ट खात्याकडे हस्तांतरित केली आहे. त्याचबरोबर येथेअतिक्रमण होऊ नये, या उद्देशाने बाजूला संरक्षण भिंत घालण्यात आली आहे; परंतु येथे आता गवत, झाडे-झुडपे वाढल्याने एक प्रकारे जंगल तयार झाले आहे. या ठिकाणी नव्याने इमारत कधी बांधणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.कळंबोली नोड सिडकोने सर्वातअगोदर विकसित केला. सुरुवातीला येथे फक्त सिडकोच्या इमारती होत्या. त्यानंतर खासगी बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्या. रोडपाली परिसर जवळपास विकसित झाला आहे. त्यामुळे या नोडची लोकसंख्या वाढली आहे. यामुळे येणारे टपाल, मनिआॅर्डर, बिल तसेच इतर पोस्टाची कामे वाढली आहेत. फायरब्रिगेडजवळ असलेले सध्याचे कार्यालय अपुरे पडत आहे. येथे जागा कमी असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सिडकोने शहर नियोजनामध्येच पोस्टाकरिता भूखंड राखीव ठेवला होता. या जागेची मागणी पोस्ट खात्याकडून करण्यात आली. या भूखंडाची रक्कम अदा करण्याबरोबर इतर सोपस्कार बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा पोस्टाच्या ताब्यात दिली गेली; परंतु बाजूलाच नाल्याला लागून असलेल्या भूखंडावर अनधिकृत झोपड्या बांधून अतिक्र मण झाले आहे. भविष्यात या जागेवरही अशाच प्रकारे अतिक्रमण करण्यात आले तर त्यांच्यावर कारवाई करणे मोठे आव्हान ठरेल. यामुळे सहा महिन्यांपूर्वी ठेकेदार नियुक्त करून चारही बाजूने संरक्षित भिंत घालण्यात आली. तसेच आतमध्ये कोणीही प्रवेश करू नये, यासाठी गेट बसविण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकाला बसण्यासाठी एक चौकीही प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक स्वरूपाचे कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पार्किंगसह इतर सुविधा देण्यात येणार आहेत; परंतु याबाबत वेगाने हालचाली होताना दिसत नाहीत. या संदर्भात पनवेल येथील अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.