शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४० गावांचा प्रवास धोक्याचा

By admin | Updated: December 22, 2015 00:35 IST

तुडील खाडी पट्टा विभागातील अतिदुर्गम भागातील ४० गावचे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होडीचा प्रवास करून दासगाव बाजारासाठी येत आहेत.

दासगाव : तुडील खाडी पट्टा विभागातील अतिदुर्गम भागातील ४० गावचे ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होडीचा प्रवास करून दासगाव बाजारासाठी येत आहेत. अन्य पर्याय नसल्याने जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत असल्याने येथील ४० गावातील ग्रामस्थांनी सावित्री खाडीवर दासगाव ते गोठे असा पूल बांधावा अशी मागणी केली आहे.महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असणारी ही खेडेगावे असून या गावात मोठ्याप्रमाणावर व्यापार उद्योग व्यवसाय आहे. तसेच शेकडो वर्षांपासून सुरू असलेला सुक्या मासळीचा आठवडी बाजारही येथे भरतो. तसेच येथे आठवडी बाजार ही भरण्यात येतो. या आठवडी बाजारासाठी तालुक्यातील तसेच अन्य तालुक्यातील जवळपास शेकडो गावे मासळी खरेदीसाठी येत असतात. तसेच पुरातन काळापासून दासगाव येथील बाजारपेठ प्रसिध्द आहे. या गावालगतच सावित्रीखाडी असून त्यापलिकडे जवळपास ४० अतिदूर्गम भागातील गावे आहेत. या गावांना शिवाजी महाराजांच्या काळापासून दासगाव बाजारपेठ नजीक असल्याने खाडीवर होडीने या गावातील ग्रामस्थ दासगाव बाजारपेठेला दैनंदिन, गृहोपयोगी, व्यवसायानिमित्त भेट देत असे. आजही मोठ्यासंख्येने या खाडीपलीकडील गावातील ग्रामस्थ होडीने प्रवास करून बाजारासाठी तसेच महामार्गाने अन्य ठिकाणी जाण्यासाठी दासगाव येथे येत असतात. दासगावला लागूनच मुंंबई-गोवा महामार्ग गेला आहे. गोठे, तुडील, जुई कुंबले, रावढळ, नरवण, खुटील, आदिसते, नडगाव, वामणे, सापे व अन्य असे जवळपास ४० गावातील ग्रामस्थांना मुंबई-पुणे, रत्नागिरी, गोवा आदी शहरांकडे जावयाचे असेल तर होडीचा प्रवास करून दासगावात येतात, मात्र महामार्गावर येणे जवळ पडते. आजही जलवाहतूक करून दासगाव याठिकाणी खाडीपलिकडील या गावातील नागरिकांना अन्य शहरामध्ये जाण्यासाठी आंबेत, टोळफाटा किंवा महाड असा जवळपास १५ कि.मी.चा अंतर प्रवास करावा लागतो. अत्यंत जिकिरीचा व आर्थिक भुर्दंड देणारा दूरचा प्रवास आहे. याकरिता सावित्री खाडीवर दासगाव ते गोठे असा पूल झाल्यास या खाडी पलिकडच्या नागरिकांची फारमोठी गैरसोय दूर होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. ४० गावातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी असूनही सरकारने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)