अलिबाग : खारघरमधील कोपरागाव येथील जॉन अब्राहन याने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवून येथील जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. डी. सावंत यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी जॉन अब्राहम याने पीडित मुलाच्या घरी जाऊन, केबलचे काम आहे, जरा माझ्या घरी चल, असे सांगून त्याला स्वत:च्या घरी नेऊन बलात्कार करून, त्याला घरीच डांबून ठेवले. संधी मिळताच पीडित मुलाने स्वत:ची सुटका करून घेऊन, आपल्या घरी येऊन आपल्या आईला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
जॉन अब्राहमला सात वर्षे सक्तमजुरी, मुलावर केले होते अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:02 IST