शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

जेएनपीटीच्या मालवाहतुकीमध्ये ९.१४ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 01:38 IST

नवीन वर्षाची सुरुवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने ही वाढ झाली असल्याचे जेएनपीटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

उरण : जेएनपीटी बंदरातून जानेवारी महिन्यात ४ लाख ६५ हजार ८४ वीस फुटी कंंटेनर मालाची (टीईयूची) वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या हाताळणीच्या तुलनेत ९.१४ टक्के वाढ अधिक आहे. नवीन वर्षाची सुरुवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने ही वाढ झाली असल्याचे जेएनपीटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.  जेएनपीटीने जानेवारी २०२१ मध्ये एकूण ६.५० दशलक्ष टन मालवाहतुकीची हाताळणी केली आहे. तर जानेवारी २०२० मध्ये ५.९१ दशलक्ष टन्स मालाची हाताळणी झाली होती. बल्क कार्गोच्या हाताळणीमध्येसुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३८.९८ टक्के वाढ झाली आहे. मागील महिन्यात ०.८२ दशलक्ष टन बल्क कार्गोची हाताळणी झाली आहे. याचबरोबर जानेवारी महिन्यात शॅलो वॉटर बर्थवर १ लाख ३४ हजार ७१३ मेट्रिक टन किनारपट्टीवरील सिमेंटची उच्चांकी वाहतूक करण्यात आली आहे. या अगोदर फेब्रुवारी २०१९ मध्ये सर्वाधिक १ लाख ३ हजार ५६० मेट्रिक टन सिमेंट वाहतुकीची नोंद झाली होती.   जेएनपीटीमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये जानेवारी महिन्यात ५१ हजार १६३ ट्रॅक्टर ट्रेलरच्या माध्यमातून ७८ हजार ८४० टीईयूची मालवाहतूक झाली. जानेवारी महिन्यामध्येच जेएनपीटीने ६० मेट्रिक टन क्षमतेचा एक ‘डेझी स्टार’ टग ताफ्यामध्ये समाविष्ट केला आहे. एसईझेडमध्ये १६ भूखंडांच्या वाटपासाठी लिलाव जेएनपीटी कोविड पूर्व कामगिरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. यापुढेही ही वाढ अशीच कायम राहील. बंदरामध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. ज्यामुळे पोर्टची कामगिरी सुधारण्यास मदत झाली आहे. बंदर आधारित एसईझेडचा यशस्वीरित्या विकास करणारे जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर आहे. जगातील अग्रगण्य कंपन्या जेएनपीटी सेझमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित होतील, असा विश्वास जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला आहे. जेएनपीटी सेझचा डीपीआरसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. 

टॅग्स :JNPTजेएनपीटी