शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

महिला असल्याने जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात नाकारली नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:18 IST

१७ प्रकल्पग्रस्त : बीएमसीटी प्रशासनाविरोधात संताप; २८ आॅगस्टला आंदोलनाचा इशारा

उरण : उरण तालुक्यातील १७ प्रकल्पग्रस्त महिलांना त्या महिला आहेत म्हणून नोकरीत सामावून घेण्यासाठी जेएनपीटीच्या चौथ्या बंदरांतर्गत उभारण्यात येत असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल( बीएमसीटी)ने नकार दिला आहे. विशेष म्हणजे, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी)च्या गुणवत्ता यादीत व मेडिकल टेस्टमध्ये पात्र असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रकल्पग्रस्त महिलांच्या न्यायहक्कासाठी २८ आॅगस्टपासून दि.बा. पाटील चौक, करळ फाटा येथे पुकारण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन उरणमधील १७ प्रकल्पग्रस्त मुलींनी केले आहे.

बीएमसीटीच्या बंदरातील व्यवस्थापनाने नोकर भरतीपासून वंचित ठेवण्याने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जेएनपीटी वसाहतीतील मल्टीपर्पज सभागृहात शुक्रवारी अन्यायग्रस्त मुलींनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बीएमसीटी कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला अनुसरून उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व इतर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी आॅपरेशन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या विभागाकरिता प्रकल्पग्रस्त आणि शैक्षणिकदृष्ट्या पात्र म्हणून अर्ज केले होते. त्यानुसार १२ जून २०१७ रोजी आॅनलाइन पद्धतीने आयोजित परीक्षेसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. सदर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर जुलै २०१७ मध्ये शारीरिक व तोंडी परीक्षाही झाल्या. बीएमसीटी कंपनीत आॅपरेशन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या विभागाकरिता पात्र असल्याने कंपनीने सर्व उमेदवारांची आॅगस्ट २०१७ मध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यामुळे आम्हाला नोकरीवर हजर होण्याचा आदेश मिळणार याची प्रतीक्षा करीत असताना आमच्यावर अन्याय करीत सोबतचे परीक्षार्थी असलेल्या सुमारे १२५ उमेदवारांना कंपनीतर्फे कामावर रु जू करून घेण्यात आले आहे.सर्वपक्षीय नेत्यांनीही महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, पत्रकार परिषदेत आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी रवि पाटील, कामगार नेते भूषण पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.४ सप्टेंबरला आमरण उपोषणच्गुणवत्ता आणि मेडिकलमध्ये पात्र असूनही केवळ महिला म्हणून आमचा विचार केला जात नसेल तर तो अन्यायकारक आहे. जेएनपीटी आणि बीएमसीटीपीएल बंदर यांच्यातील सामंजस्य करारनुसार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे याविरु द्ध २८ आॅगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण व नंतर ४ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरु वात केली जाणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त महिलांनी बीएमसीटीच्या मुजोर व्यवस्थापनाला दिला आहे.

टॅग्स :RaigadरायगडWomenमहिलाjobनोकरी