शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 01:04 IST

JNPT : पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

- मधूकर ठाकूर

उरण : जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनल खासगीकरणाचा प्रस्ताव दोन कामगार ट्रस्टींच्या (प्रतिनिधी) विरोधानंतरही गुरुवारी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत ८ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला. पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या वेळी जेएनपीटी प्रशासन भवनासमोर पोलीस, सीएसआयएफ जवानांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता. अध्यक्ष संजय सेठी यांच्यासह दहा ट्रस्टी उपस्थित होते. या बैठकीत खासगीकरणाचा प्रस्ताव चर्चेसाठी येताच कामगार प्रतिनिधी दिनेश पाटील, भूषण पाटील यांनी जोरदार विरोध केला. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत प्रस्तावाला विरोध करतानाच कंटेनर टर्मिनल जेएनपीटीने स्वत: चालविण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने याआधीच जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार प्रतिनिधींच्या विरोधाची नोंद घेऊन ८ विरुद्ध २ मतांनी अखेर मंजूर करण्यात आला. कामगार प्रतिनिधींनी या कंटेनर टर्मिनलच्या प्रस्तावावर मतदान घेण्याचीही मागणी केली होती. तर बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्याने मतदान घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिले.

थकीत मालमत्ता कर अदा करणार- कामगारांसाठी असलेल्या एसव्हीआरएसच्या प्रस्तावावरील काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी मान्य करण्यात आली. तसेच पाच ग्रामपंचायतींचा थकीत असलेला मालमत्ता कर अदा केली जाणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटी