शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएची उरण परिसरातील गावातील विकास प्रकल्पांसाठी १७ कोटींचा सीएसआर फंड मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 21:47 IST

या मंजूर निधीची घोषणा जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे.

मधुकर ठाकूर, उरण : जेएनपीएने उरण परिसरातील गावातील  १६ विविध विकासकामांसाठी सीएसआर फंडातून १७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मंजुर निधीची घोषणा जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे.

जेएनपीएने याआधीच शेकडो कोटींच्या सीएसआर फंडाची काही राजकीय पक्षांच्या मागणीवरून खैरात केली आहे.स्थानिकांना डावळून वाटप करण्यात आलेल्या या शेकडो कोटींच्या सीएसआर निधीच्या वाटपावरून येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची भावना आहे.स्थानिकांचा असंतोष जेएनपीएला परवडणारा नाही. त्यामुळे जेएनपीटीचे प्राधिकरण झाल्यानंतर आणि प्राधिकरणामुळे जेएनपीए बोर्ड ऑफ ट्र्स्टींकडेच ठराविक निधी मंजूरीचे अधिकार आले आहेत. या अधिकारानंतर स्थानकांच्या भावना लक्षात घेऊन जेएनपीएने उरण परिसरातील गावातील १६ विविध प्रकल्पाच्या विकासकामांसाठी सीएसआर फंडातून १७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.फेबु्वारी महिन्यात झालेल्या बोर्ड ऑफ ट्र्स्टींच्या बैठकीत या १७ कोटींच्या सीएसआर निधीला मंजुरी देण्यात आली होती.या मंजुरी देण्यात आलेल्या सीएसआर फंडातील विविध विकासकिमांची घोषणा नुकतीच जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्थानिकांच्या बैठकीतुन केली आहे.यामध्ये सर्वाधिक  ९ कोटी ८९ लाख ७० हजार सीएसआर फंड नविन शेवा ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते ,गटारे आदी विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहे.तर जनकल्याण सेवाश्रम बेलपाडा -उरण तर एक कोटीचा निधी रयत शिक्षण संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 या मंजूर करण्यात आलेल्या १७ कोटींच्या सीएसआर फंडातून आरोग्यसेवा, शिक्षण, पर्यावरण आणि समुदाय विकास यांसह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. उल्लेखनीय उपक्रमांमध्ये वंचित महिलांसाठी कर्करोगाशी संबंधित तपासणी, ट्रक चालकांसाठी आरोग्य संरक्षण, परिघीय रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचे बांधकाम, पर्यावरण जागरूकता, कौशल्य विकास कार्यक्रम, पूर व भूस्खलन प्रभावित भागात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे.हे प्रकल्प बंदराच्या सभोवतालच्या समुदायांमधील गरजा पूर्ण करण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि रहिवाशांचे कल्याण वाढवण्यासाठी बनविलेले असल्याचे जेएनपीएचे कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :uran-acउरण