शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीए-मुंबई प्रवास आता ३५ ते ४० मिनिटांत होणार शक्य; प्रदूषणविरहित अत्याधुनिक  दोन स्पीड बोटी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:17 IST

प्रवासीसंख्या कमी झाल्याने व लाकडी बोटी या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आल्याने जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी- सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीड बोटींचा पर्याय निवडला आहे.

उरण : जेएनपीएच्या गेट-वेपर्यंतची सागरी प्रवासी  स्पीड बोटींची शुक्रवारी ट्रायल घेण्यात येणार आहे. ती यशस्वी झाल्यानंतर लागलीच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जाणार आहे. या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना जेएनपीए-मुंबई हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत करता येणे शक्य होणार आहे.

  प्रवासीसंख्या कमी झाल्याने व लाकडी बोटी या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आल्याने जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी- सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीड बोटींचा पर्याय निवडला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने काही महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. यासाठी इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या प्रदूषणविरहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या दोन फायबरच्या हलक्या स्पीड बोटी १० वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. 

३७ कोटी ८९ लाखांची तरतूद माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटीपुरवठा व हाताळणीचे काम दिले आहे. १० वर्षांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या स्पीड बोट सेवेसाठी जेएनपीएने ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० रुपये खर्चाची तरतूदही केली आहे. उन्हाळी हंगामात २०-२५ प्रवासी व पावसाळी हंगामात १०-१२ क्षमतेच्या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेल्या दोन स्पीड बोटी गेल्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच वाहतुकीसाठी जेएनपीटीच्या सेवेत दाखल होणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे स्पीड बोट सेवा सुरू करण्यात विलंब झाला आहे. आता शुक्रवारी त्यांची ट्रायल घेण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीएचे उपसंरक्षक कॅ. बाळासाहेब पवार यांनी दिली. 

यांना होणार बोटींचा फायदा सागरी स्पीड बोट सेवा बंदरात कामकाजासाठी मुंबईतून ये- जा करणाऱ्या जेएनपीएचे कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि फॅमिली मेंबर्स, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे वेळही वाचण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड