शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जेएनपीए साडेबारा टक्के भूखंड वाटपात अडचणीच अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2023 19:41 IST

प्रत्यक्षात ताब्यात देण्यासाठी दिड-दोन वर्षांहूनही अधिक कालावधी लागणार: जेएनपीए -सिडकोच्या धरसोड वृत्तीचा परिणाम 

मधुकर ठाकूर

उरण :  प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भुखंडाचा वाटपाचा असलेला प्रश्न सिडको, जेएनपीए यांच्या धरसोड वृत्तीमुळे मागील ३४ वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे.मात्र सिडकोच्या उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक संचालकपदी अनुभवी मराठी असलेल्या अनिल डिग्गीकर यांच्या नियुक्तीनंतर लवकरच सुटण्याची शक्यता प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. सिडकोने जेएनपीए बंदरासाठी सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची २७०० हेक्टर जमीन संपादन केली आहे.

संपादन केलेल्या जागेपोटी खातेदार असलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या १२००० वारसांना जेएनपीएने साडेबारा टक्के विकसित भुखंडाचे वाटप केलेले नाही.त्यामुळे जेएनपीए विरोधात मागील ३४ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे.याआधी साडेबारा टक्के भूखंड वाटपाची जबाबदारी झटकून जेएनपीए सिडकोकडे बोट दाखवत होती.त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या दबावामुळे वठणीवर आलेल्या जेएनपीएने साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप करण्यासाठी १११ हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आल्याची घोषणा केली होती.या भुखंडाचा वाटपाची जबाबदारी जेएनपीएने सिडकोकडे सोपवली आहे. 

सिडकोनेही भुखंड विकसित करुन देण्याच्या विविध कामासाठी ३७९ कोटी रुपये खर्चाची मागणी केली आहे.जेएनपीएनेही रांजणपाडा,जासई  दरम्यान १११ हेक्टर क्षेत्रावर भराव सुरू करण्यात आलेल्या कामापोटी आतापर्यंत १६० कोटी रुपये सिडकोला अदा केले आहेत.तसेच काम होईल त्याप्रमाणे आणखी निधी उपलब्ध करून देण्याचा इरादाही जेएनपीएने जाहीर केला आहे.मात्र विविध अडथळे, अडचणींमुळे अद्याप तरी  साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रक्रिया पुर्णत्वास गेलेली नाही.त्यामुळे जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना अद्यापही साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपाच्या प्रतिक्षा करावी लागते आहे.मात्र याआधी जेएनपीएचे चेअरमनपद उपभोगलेल्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा चांगल्याप्रकारे अभ्यास असलेल्या अनिल डिग्गीकर यांची नुकतीच सिडकोच्या उपाध्यक्ष व महाव्यवस्थापक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जेएनपीए प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनिल डिग्गीकर नक्कीच पुढाकार घेऊन सोडवतील असा विश्वास येथील प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केला जात आहे. 

भुखंड वाटपात अनेक अडचणी१११ हेक्टर क्षेत्रातच २६ टक्के जागा कमी पडत असल्याने जेएनपीए बाधीत प्रकल्पग्रस्तांना भुखंड वाटप करण्यासाठी चटईक्षेत्र १.५ ऐवजी दोन असा वाढवून देण्यात येणार आहे.मात्र यासाठी २७ प्लांट एकत्रित करून वाटण्याचा प्रस्ताव आहे.मात्र यासाठी प्लाटधारक प्रकल्पग्रस्तांमध्येच एकजूट नसल्याने दिसून येत आहे.५५ टक्के प्रकल्पग्रस्त २७ प्लांट एकत्रित करून वाटण्याचा प्रस्तावासाठी राजी आहेत. तर ४५ टक्के प्रकल्पग्रस्तांचा एकत्रितकरणाला विरोध दर्शवून सेपरेशनची मागणी करण्यात आली आहे.तर ५ टक्के प्रकल्पग्रस्तांना स्वताचे प्लांट ५० -५० टक्के विकसित करण्याची भूमिका घेतली आहे.तर भुखंडासाठी २२ टक्के वारसांमध्येच न्यायालयात तंटे सुरू आहेत.शिवाय आरक्षित १११ हेक्टर क्षेत्रावरील काही ठिकाणी अतिक्रमणेही करण्यात आली आहेत.त्यामुळे जेएनपीए प्रशासनाच्या डोकेदुखीत आणखीन भर पडली आहे.त्याचबरोबर भुखंड विकसित करुन वितरित करुन प्रत्यक्षात ताब्यात देण्यासाठी आणखी दिड-दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती जेएनपीए कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी दिली.