शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ, शिवरायांची विचारधारा भावी पिढीमध्ये रुजली पाहिजे - अदिती तटकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 04:49 IST

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करीत आहोत. भावी पिढ्यांच्या मनात ही विचारधारा रुजली पाहिजे व आत्मसात करायला हवी.

महाड/बिरवाडी : राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करीत आहोत. भावी पिढ्यांच्या मनात ही विचारधारा रुजली पाहिजे व आत्मसात करायला हवी. त्यासाठी शालेय जीवनापासून त्यांच्या मनावर जिजाऊ-शिवरायांचे विचार रु जविण्याचा प्रयत्न शिक्षक-पालकांनी करायला हवा या युगपुरुषांबद्दल राजकीय नेत्यांचे विचार ऐकण्याऐवजी भावी पिढींचे विचार काय आहेत ते ऐकण्यासाठी या वर्षीपासून रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने जिजाऊ जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन महाड तालुकास्तरावर करण्यात आले होते. पुढील वर्षापासून ही वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाचाड येथे जाहीर केले.रायगड जिल्हा परिषद पाचाड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊंच्या ४२० व्या जयंतीचे आयोजन पाचाड येथे करण्यात आले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अदिती तटकरे बोलत होत्या. सर्वप्रथम पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळावर जिजाऊंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन राजिप अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाड पंचायत समितीचे सभापती सीताराम कदम, राजिप सदस्य जितेंद्र सावंत, मनोज काळीजकर, संजय कचरे, माजी सदस्य बाळ राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या अभिवादन सभेत अदिती तटकरे यांनी रायगड संवर्धनाचा शुभारंभाचा पहिला श्रीफळ हा किल्ले रायगडप्रमाणेच पाचाड येथेही वाढवण्यात यावा, अशी मागणी करीत रायगड संवर्धनात आपले योगदान असावे ही स्थानिक जनता व लोकप्रतिनिधींची अपेक्षा रास्त असून, त्यांचा सहभाग समितीमध्ये असल्याखेरीज रायगड संवर्धनाचे काम परिपूर्ण होणार नाही. त्यासाठी स्थापन होणाºया संघर्ष समितीचे विचार आपण शासनापर्यंत पोचवू असे आश्वासन देत पाचाडकरांच्या पाणीप्रश्नासाठी विशेष बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावेन, असे अभिवचन दिले. राजकारणात कोणत्याही पदावर असेन अथवा नसेन, परंतु यात असेपर्यंत जिजाऊ जयंती-पुण्यतिथीच्या सोहळ्यास आपण हजर राहू, असे आश्वासन अदिती तटकरे यांनी यावेळी दिले.महाडमध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरीमहाड : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती शुक्रवारी महाडमध्ये साजरी करण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने जिजामाता उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या वेळी उपनगराध्यक्षा सुषमा यादव,महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सपना बुटाला, पाणीपुरवठा सभापती भाग्यश्री फुटाणकर, नेहा कदम बेलोसे, नगरसेविका हमीदा शेखनाग आदींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड