शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

श्री बल्लाळेश्वर देवस्थानला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:37 IST

अष्टविनायक देवस्थानापैकी एक असलेले पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानाला सेवा क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे ९०१-२०१५ आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक असलेले पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानाला सेवा क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे ९०१-२०१५ आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मानांकनामुळे बल्लाळेश्वर देवस्थानची गणेशभक्तांच्या सेवेप्रति असणाऱ्या कार्याची पावती मिळाल्याचा आनंद देवस्थानच्या कार्यकारिणीसह गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे.मुंबई येथील क्वालिटी रिसर्च आॅर्गनायजेश अ‍ॅक्रिडटेशन बोर्डचे लक्ष्मीकांत साधू यांच्या हस्ते श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप व सर्व विश्वस्तांना ९०१-२०१५ आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वितरण करून गौरविण्यात आले. अष्टविनायकांपैकी आयएसओ मानांकन मिळविणारे पाली तिसरे देवस्थान आहे. पाली बल्लाळेश्वर देवस्थानातील कार्यालयात प्रमाणपत्र वितरण व प्रसाद लाडू योजनेचा शुभारंभ पार पडला. पाली बल्लाळेश्वर देवस्थान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आध्यात्मिक केंद्र बनेल, असा विश्वास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धारप यांनी व्यक्त केला.लक्ष्मीकांत साधू म्हणाले, बल्लाळेश्वर देवस्थानचे नियोजनबद्ध कार्यक्र म, कार्यालयीन दस्तावेज, याबरोबरच सुसज्ज व्यवस्थापन, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवासाची उत्तम व दर्जेदार सुविधा, भोजन व प्रसादाची व्यवस्था, मंदिर परिसरातील स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरे, भाविक भक्तगणांना पुरवल्या जाणाºया आवश्यक सेवा व सोई-सुविधा, भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी केलेली रेलिंग व्यवस्था आदी बाबीतून देवस्थानचे सुव्यवस्थापन दिसून येत असल्याचे साधू यांनी सांगितले.प्रास्ताविकात जितेंद्र गद्रे यांनी, बल्लाळेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील पहिल्या तीन देवस्थानांपैकी एक असेल, असा संकल्प केला आहे. देवस्थानामार्फत मंगळवारी आठ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. भाविक व नागरिकांना भोजनाव्यतिरिक्त प्रसाद लाडू योजनेद्वारे प्रसाद दिला जाणार आहे, तसेच देवस्थानतर्फे यज्ञशाळेचे निर्माण करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना सामूहिक याग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अन्नछत्राच्या टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस निर्मिती आणि देवस्थानच्या पाणी पंपासाठी लागणारी वीज म्हणून सोलर एनर्जीचा उपक्र म देवस्थानने सुरू केला असल्याचे गद्रे यांनी सांगितले.