शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिवेआगर पर्यटनस्थळ आहे की डम्पिंग ग्राऊंड?, रस्त्यांसह नदी, नाले कचऱ्यामुळे भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:22 IST

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे.

- गणेश प्रभाळे

दिघी : देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटनस्थळाला आता धार्मिक स्थळाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, कचऱ्याच्या समस्येमुळे दिवेआगर पर्यटनस्थळाचे आता विद्रुपीकरण होत आहे.

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. येथील स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे इथल्या पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

यासाठी रोजगाराच्या दृष्टीने सर्वत्र हॉटेल्स व होमस्टे व्यवसायांचे जाळे पसरले आहे. मात्र, यातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे असंख्य प्रकारच्या प्लास्टिकचा भस्मासुर येथील रस्ता, नदी, नाल्यात पाहायला मिळत आहे.

प्लास्टिकचा खचदिवेआगरचा समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक राहावा, सदैव पर्यटकांनी गजबजून जावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, पर्यटनस्थळाला जोडणारे बोर्लीपंचतन, भरडखोल व वाकडा पूल असे तीन मार्ग असून, या मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्माकोल, मिनरल वॉटर व कोल्ड्रिंक्सच्या असंख्य बाटल्यांचा खच पडला आहे. याच रस्त्यांच्या तिन्ही बाजूंना यशवंती खार परिसरात स्थानिकांच्या नियमित पीक घेणाऱ्या शेतजमिनी आहेत. मात्र, पर्यटकांना नेहमीच साद घालणाऱ्या या खाड्या, प्लास्टिक व कचरा, गाळाने भरल्या आहेत.

दिवेआगर हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आपला परिसर नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिल पाहिजे. अशाप्रकारे जर दुर्गंधी पसरली जात असेल तर पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कचरा टाकताना सापडल्यावर दंडात्मक कार्यवाही आतापर्यंत केली आहे; परंतु यापुढे जर कचरा टाकताना कोणी सापडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.- सिद्धेश कोजबे, सरपंच, दिवेआगर

टॅग्स :Raigadरायगड