शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

केबल टीव्ही घोटाळ्याचा तपास इन्कमटॅक्सकडून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:55 IST

केबल टीव्ही ग्राहकांना पावती न देता, त्यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची माया जमवलेल्या घोटाळ्याचा आता आयकर विभागानेही तपास सुरू केला आहे.

अलिबाग : केबल टीव्ही ग्राहकांना पावती न देता, त्यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची माया जमवलेल्या घोटाळ्याचा आता आयकर विभागानेही तपास सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केबलचालक तसेच मल्टीसिस्टीम आॅपरेटर्सचे धाबे दणाणले आहेत.अलिबाग येथील केबल व्यावसायिकांनी ग्राहकांची लुबाडणूक करून सुमारे ५० कोटी रु पये कमावल्याची तक्र ार येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी जिल्हा प्रशासनासह आयकर विभागाकडे केली होती. जिल्हा प्रशासनाकडे गेले सहा महिने सुरू असलेल्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकाºयांनी हे प्रकरण निकालावर ठेवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याबाबत कोणता निणर्य देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बहुतांश केबलचालक हे ग्राहकांना पावती देत नाहीत. अलिबाग येथील केबलचालक त्यांच्या ग्राहकांना गेली दहा वर्षे कोणत्याही प्रकारची पावती न देता, ग्राहकांकडून विनापावती फी व विक्र ीकर वसूल करीत आहेत. असा अहवाल अलिबागच्या तहसीलदारांनी याआधीच जिल्हा प्रशासनाना दिला होता. केबलचालक वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आयकर, तसेच विक्रि कर विभागाचे कर बुडवून कमवित आहे. त्यामुळे त्यांच्या अवैध उत्पन्नाची चौकशी होण्याबाबत तीनशे पानांच्या भरभक्कम पुराव्यांसह आयकर विभागाकडे संजय सावंत यांनी तक्र ार दाखल केली होती. त्या तक्र ारीची दखल आयकर विभागाने घेत प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सावंत यांना माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरातून समोर आले आहे.या तक्र ारीमधील सर्वात धक्कादायक बाब आयकर विभागाच्या नजरेस आणून देताना, सावंत यांनी अलिबाग येथील केबलचालक हे आता केबल व्यवसाय हा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचा दावा करीत असले, तरी त्यांच्या पत्नीने अलिबाग २०१६ साली नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढविली आहे. त्या नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्यांनी त्या वेळी निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्र सादर करताना या केबल व्यवसायाविषयी काहीही नमूद केलेले नाही, हे सांगताना त्यांच्या प्रतिज्ञापत्राची प्रतही आयकर विभागाकडे सादर केली आहे. तसेच याच प्रतिज्ञापत्रात पती-पत्नी दोघांनीही आयकर भरत नसल्याचे लिहून दिले आहे. त्यांनी स्वत:चे पॅन कार्ड नंबरही नमूद केलेले नाहीत. वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न तेही ग्राहकांकडून विनापावती गोळा करणारे हे दाम्पत्य निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचे आयकर विवरण व पॅन कार्ड नंबर दर्शवित नसल्याने त्यांची व त्यांच्याशी संबंधित सर्वांची करचुकवेगिरी करून राष्ट्रीय उत्पन्नाची हानी केल्याप्रकरणी आयकर विभागामार्फत तपास सुरू झाल्याने जिल्ह्यातील इतर केबलचालकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.