शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखती, पैसेही घेतले; पण चार वर्षे झाले नोकरीच नाही, हजारो स्थानिक तरुणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:13 IST

रायगड सुरक्षा मंडळाकडून हजारो स्थानिक तरुणांची फसवणूक

अलिबाग : नोकरीचे आमिष दाखवून अलिबाग, पेण तालुक्यातील हजारो तरुणांकडून पैसे घेत, रायगड सुरक्षा मंडळाचे अधिकारी मारुती पवार, मनोज ठमके यांनी फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. मुलाखती आणि पैसे देऊन चार वर्षे होऊन गेली, तरी या तरुणांना नोकरी मिळत नसल्याने, हे तरुण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. फसवणूक झालेल्या या सर्व बेरोजगार तरुणांना हमखास न्याय मिळेल, अशी ग्वाही राजा केणी यांनी दिली आहे. 

प्रत्येकी ४० हजार उकळले    रायगड सुरक्षारक्षक मंडळ हे नीम शासकीय मंडळ असून, त्यांच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांच्या नेमणुका केल्या जातात.     विविध कंपन्या, कार्यालयात सुरक्षारक्षकाची नोकरी मिळेल, असे आमिष दाखवत, प्रत्येकाकडून ४० हजार रुपयांपर्यंत पैसे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उकळले. या घटनेस चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटला, तरीही रायगड सुरक्षा मंडळाने जिल्ह्यातील १ हजार २०० तरुणांना नोकऱ्याच दिल्या नाहीत. 

ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे, यातील बहुतांश तरुण भीती आणि लाजेखातर पुढे येऊन तक्रार करण्यास धजावत नाहीत, अशा तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे यावे.  न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची.   - राजा केणी, जिल्हाप्रमुख शिवसेना.

माझ्याकडून ४० हजार रुपये रोखीने घेण्यात आले, मनोज ठमके या व्यक्तीकडे हे पैसे दिले होते. त्यानंतर, मी अनेकदा त्यांच्याकडे विचारणा केली; परंतु नोकरीही नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत.- प्रकाश मेंगाळ, बेरोजगार तरुण.

हमखास नोकरी लागेल, असे सांगून माझ्याकडे ८० हजार रुपये मागण्यात आले होते, त्यातील ४० हजार रुपये मी उसणवारी करून पोच केले; माझ्या प्रमाणेच अलिबाग, पेण तालुकातील अनेक तरुण आहेत. - गजेंद्र म्हात्रे, बेरोजगार तरुण.

टॅग्स :fraudधोकेबाजी