शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सायन-पनवेल महामार्गासाठी संपादित जमिनीची परस्पर विक्री

By admin | Updated: February 12, 2017 03:14 IST

सायन-पनवेल मार्गासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई सायन-पनवेल मार्गासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन परस्पर खासगी कंपनीला विकण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने ३९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सायन-पनवेल मार्गासाठी शासनाने १९६५ साली २ हेक्टर ८८ आर जमीन संपादित केली होती. प्रत्यक्षात त्यापैकी १ हेक्टर १८ आर जमिनीचा रस्त्यासाठी वापर झालेला असून, उर्वरित जमीन अद्यापही शासनाच्या ताब्यात आहे; परंतु संपादित करूनही वापर न झालेली जमीन परत मिळावी यासाठी नवी मुंबईतील काही शेतकऱ्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास शासनाच्या संबंधित विभागाने नकार दिला होता. मोबदला देऊन संपादित केलेली जमीन परत देता येत नसल्याचे शासनाचे धोरण आहे. संपादित केलेली परंतु वापर न झालेली जमीन केवळ शासनाच्याच इतर उपक्रमासाठी वापरली जाऊ शकते. अथवा अशा जमिनीचा जाहीर लिलाव करून विक्री केली जाते. या धोरणानुसार त्या शेतकऱ्यांना संपादित केलेली जमीन परत देण्यास शासनातर्फे नकार मिळाला होता. असे असतानाही त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या ताब्यातील जमीन परस्पर विकल्याचा प्रकार घडला आहे. प्रमुख तिघांच्या साहाय्याने या शेतकऱ्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी ही जमीन विक्रीसाठी काढली होती. त्यानुसार सायन-पनवेल मार्गालगतची जमीन विक्रीसाठी निघाल्याची माहिती अतुल गोयल व गोपाल मोहटा यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, शासनाने रस्त्यासाठी संपादित केलेली जमीन परत दिलेली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय अशा प्रकारच्या आदेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीही त्यांना देण्यात आल्या होत्या. यानुसार गोयल व मोहटा यांनी संबंधित शेतकऱ्यांना एक कोटी रुपये देऊन जमिनीचा व्यवहार केला होता. याप्रकरणी तीन महिन्यांच्या तपासाअंती ३९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी कंपनीसोबत व्यवहारासाठी वापरलेली कागदपत्रे बनावट असल्याचेही निष्पन्न झाले असून, ही कागदपत्रे त्यांनी कोणाकडून बनवली याचाही अधिक तपास सुरू आहे. - शिवाजी आवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक शाखा