शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विभागाची निष्क्रीयता : थकीत बिलापोटी घरापुरी बेट अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:46 IST

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घारापुरी बेटावरील गावांना साडेतीन तास वीजपुरवठा करणा-या जनरेटरसाठी डिझेल पुरविणा-या ठेकेदाराचे डिसेंबर २०१६पासून आजतागायत ४० लाख रुपये थकविले आहेत.

मधुकर ठाकूर उरण : महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घारापुरी बेटावरील गावांना साडेतीन तास वीजपुरवठा करणा-या जनरेटरसाठी डिझेल पुरविणा-या ठेकेदाराचे डिसेंबर २०१६पासून आजतागायत ४० लाख रुपये थकविले आहेत. थकीत रकमेचे बिल अदा न केल्याने डिझेलचा पुरवठा बंद करण्यात आहे. ठेकेदाराच्या डिझेल पुरवठ्याअभावी आणि पर्यटन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मात्र जागतिक कीर्तीचे घारापुरी बेट शनिवारपासून पुन्हा अंधारात आहे.जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर मागील ३० वर्षांपासून जनरेटरद्वारे साडेतीन तास वीजपुरवठा केला जात आहे. महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीखाली बेटावरील तीन गावांना वीजपुरवठ्याचे काम सुरू आहे. जनरेटरसाठी डिझेल पुरवठ्याचे काम घारापुरी बेटावारीलच मे. महेश ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुर्स या कंपनीकडे देण्यात आले आहे. डिझेलचा पुरवठा करण्याची तयारी काही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्शविली असतानाही मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या आशीर्वादाने आणि अधिकाºयांच्या आर्थिक साटेलोट्यातून डिझेल पुरठ्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे.महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे घारापुरी बेटाला वीजपुरवठा करणारे जनरेटर नादुरुस्त झाले होते. त्यामुळे मागील आक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांदरम्यान सुमारे दोन महिने बेट अंधारात बुडाले होते. बेटावरील पर्यटन विभागाच्या बेपर्वाहीमुळेच घारापुरी बेटवासीयांवर अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती. नवनिर्वाचित सरपंच बळीराम ठाकूर आणि सदस्य व ग्रामस्थांनी थेट पर्यटन विभागाच्या महाव्यवस्थापक विजय वाघमारे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतरच बेटावरील जनरेटर दुरुस्तीचे काम होऊन सोडतीन तासांचा का होईना वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला होता.आता डिझेलच्या थकीत असलेल्या ४० लाखांच्या बिलासाठी घारापुरी बेटाचा जनरेटरवरील वीजपुरवठा ठेकेदाराने बंद केला आहे. थकित बिल अदा केल्याखेरीज डिझेलचा पुरवठा करण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शविली असल्याचे लेखी पत्र पर्यटन विभागाच्या बेटावरील चालुक्य उपाहारगृहाच्या निवास व्यवस्थापकांनी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य लेखाधिकाºयांना दिले आहे. यामध्ये त्यांनी जनरेटरसाठी १९ जानेवारीपर्यंतच डिझेलचा साठा उपलब्ध आहे. २० जानेवारीपासून डिझेल पुरवठ्याअभावी वीजपुरवठा खंडित केल्याने तीन महिन्यांपासून घरापुरी बेट अंधारात आहे. याकडे निवास व्यवस्थापनाने लक्ष वेधले होते. मात्र, पर्यटन विभागाने याकडे दुर्लक्ष के ल्याने शनिवार, २० जानेवारीपासून वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे घरापुरी बेट अंधारात बुडाले आहे.२७-२८ जानेवारी रोजी एलिफंटा महोत्सवघारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठ्याचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. विद्युत ट्रान्सफार्मरही चार्ज करून झाले आहेत. समुद्रातून अंडरग्राउंड टाकलेल्या वीजवाहिन्यांच्याचेही टेस्टिंगचे काम झाले आहे. त्यामुळे घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठ्याचे काम पूर्ण होण्यास फक्त काही दिवसच बाकी आहेत.येत्या २७ आणि २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित एलिफंटा महोत्सवही साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने पर्यटन विभाग आणि घारापुरी ग्रामस्थांना वेठीस धरून डिझेलच्या थकीत रकमेची वसुली करण्याचा इरादा ठेकेदाराचा असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होऊ लागला आहे. ग्रामपंचायतीवर सेनेची सत्ता येताच ठेकेदाराकडून डिझेल पुरवठा बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड