शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

'एका क्लिकवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्सची माहिती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 22:11 IST

रायगड जिल्ह्यातील रुग्ण संख्ये दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा समुह संर्सग झाल्याचे आकडे वारीवरुन दिसून येते.

ठळक मुद्देएका क्लिकवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ थांबण्यास मदत मिळणार आहे.

रायगड - जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली आहे. रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सीजन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ हाेते. यातून आता सुटका होणार आहे. एका क्लिकवरच सर्व माहिती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वीत केली आहे.

रायगड जिल्ह्यातील रुग्ण संख्ये दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा समुह संर्सग झाल्याचे आकडे वारीवरुन दिसून येते. वाढत्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये वेळेवर बेड उपलब्ध होत नाही. कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड शिल्लक आहेत. हे प्रत्यक्षात तेथे गेल्यावरच रुग्णांच्या नातेवाईकांना कळते. त्यामुळे बेड उपलब्ध नसल्याने त्यांची चांगलीच दमछाक होते आणि रुग्णांचेही हाल होतात. नागरिकांना आरोग्य व्यवस्थेबाबतची माहिती तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून "रायगड जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली" (डॅशबोर्ड) कार्यान्वित केली आहे. 

एका क्लिकवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ थांबण्यास मदत मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.gov.in या वेबसाईटवर www.covid19raigad.in ही url लिंक संलग्न केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या तसेच अन्य अनुषंगिक माहिती तात्काळ समजू शकणार आहे.    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या सरकारी वेबसाईटवर जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या करोना उपाययोजनांबाबतची, सरकार निर्णयाची, विविध सरकारी आदेशांची इत्यंभूत माहितीही देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगडhospitalहॉस्पिटल